World Cup 2019: ऑस्ट्रेलियाच्या दमदार विजयानंतर पाहा पॉईंटटेबलमध्ये कोण कुठल्या स्थानी

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 15, 2019 | 23:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Cup 2019: ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील वर्ल्डकपमध्ये २० वा सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर ८७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

australia team
ऑस्ट्रेलिया संघ 

लंडन: ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात आज रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच. आरोन फिंचच्या दमदार दीड शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी ३३५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र श्रीलंकेला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. श्रीलंकेचा संपूर्ण संघ २४७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी बोलावले. ऑस्ट्रेलियाची सुरूवातीपासूनच कामगिरी जबरदस्त होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने जबरदस्त १५३ धावांची खेळी केली. तर स्टीव्हन स्मिथने ७३ धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने ४६ धावांची खेळी केली. 

त्याबदल्यात श्रीलंकेने सुरूवात दमदार केली. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने ९७ धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने १३२ चेंडूत ९ चौकारांसह त्याने ही खेळी साकारली. तर पेरेराने ५२ धावा केल्या. मात्र या दोघांच्या खेळी व्यर्थ गेल्या. श्रीलंकेची सुरूवात जरी दमदार झाली असली तरी पुढील गोलंदाजांना खेळपट्टीवर टिकण्यात यश आले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेचा डाव लवकर गुंडाळण्यात यश मिळाले. 

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर रिचर्डसनने ३ गडी बाद केले. पॅट कमिन्सने २ गडी तर बेहरनड्रॉफने एक गडी बाद केला. श्रीलंकेविरुद्धच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पॉईंटटेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचे पॉईंटटेबलमध्ये ४ विजयानिशी ८ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांपैकी ४ सामन्यांत विजय मिळवला. भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंकेने ५ सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवला दोन सामन्यांत पराभव तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup 2019: ऑस्ट्रेलियाच्या दमदार विजयानंतर पाहा पॉईंटटेबलमध्ये कोण कुठल्या स्थानी Description: World Cup 2019: ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील वर्ल्डकपमध्ये २० वा सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर ८७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola