IND vs AUS : चेन्नईच्या वन डे मध्ये भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाचा विजय; ऑस्ट्रेलियाने सीरिज पण जिंकली

Australia won by 21 runs against India in Chennai ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वन डे मॅचच्या सीरिजमधील निर्णायक चेन्नई वन डे ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकली. ही मॅच जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची वन डे सीरिज 2-1 अशी जिंकली.

Australia won by 21 runs against India in Chennai ODI
चेन्नईच्या वन डे मध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चेन्नईच्या वन डे मध्ये भारताचा पराभव
  • चेन्नईच्या वन डे मध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय
  • 3 वन डे मॅचच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय

Australia won by 21 runs against India in Chennai ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वन डे मॅचच्या सीरिजमधील निर्णायक चेन्नई वन डे ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी जिंकली. ही मॅच जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची वन डे सीरिज 2-1 अशी जिंकली. सीरिजमधील मुंबईतली मॅच भारताने 5 विकेट राखून जिंकली तर ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टणमची मॅच 10 विकेट राखून आणि चेन्नईची मॅच 21 धावांनी जिंकली.

चेन्नईच्या मॅचमध्ये टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटिंगचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करून ऑस्ट्रेलियाने 49 ओव्हरमध्ये सर्वबाद 269 धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताला 49.1 ओव्हरमध्ये सर्वबाद 248 धावा करणे जमले. ऑस्ट्रेलियाने मॅच 21 धावांनी जिंकली.

प्रथम बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाकडून हेडने 33, मार्शने 47, स्मिथने शून्य, वॉर्नरने 23, लबुशेनने 28, केरीने 38, स्टोईनिसने 25, अॅबॉटने 26, एगरने 17, स्टार्कने 10 आणि झंपाने नाबाद 10 धावांचे योगदान दिले. भारताकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3 तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 

धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताकडून रोहित शर्माने 30, शुभमन गिलने 37, विराट कोहलीने 54, केएल राहुलने 32, अक्षर पटेलने (धावचीत) 2, हार्दिक पांड्याने 40, सूर्यकुमार यादवने शून्य, रवींद्र जडेजाने 18, कुलदीप यादवने (धावचीत) 6, मोहम्मद शमीने 14, मोहम्मद सिराजने नाबाद 3 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झंपाने 4, अॅश्टन अॅगरने 2, स्टोईनिसने 1 आणि अॅबॉटने 1 विकेट घेतली.

  1. मॅन ऑफ द मॅच : अॅडम झंपा
  2. मॅन ऑफ द सीरिज : एम. मार्श

ऑस्ट्रेलियाने 4 वर्षांनंतर भारतात जिंकली वन डे सीरिज​

ऑस्ट्रेलियाने तब्बल 4 वर्षांनंतर भारतात वन डे सीरिज जिंकली. याआधी 2019 मध्ये अॅरॉन फिंचच्या नेतृत्वात भारतात 5 मॅचची वन डे सीरिज जिंकली होती. त्या सीरिजमध्ये पहिल्या 2 मॅच भारत आणि नंतरच्या 3 मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकल्या होत्या. यावेळी (2023) स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 3 मॅचची वन डे सीरिज जिंकली. या सीरिजमध्ये पहिली मॅच भारताने आणि नंतरच्या दोन मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकल्या.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

  1. गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 ते सोमवार 13 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली टेस्ट, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर - भारत 1 डाव आणि 132 धावांनी विजयी
  2. शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी टेस्ट, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली - भारत 6 विकेट राखून विजयी
  3. बुधवार 1 मार्च 2023 ते रविवार 5 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी टेस्ट, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धरमशाला - ऑस्ट्रेलिया 9 विकेट राखून विजयी
  4. गुरुवार 9 मार्च 2023 ते सोमवार 13 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी टेस्ट, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद - ड्रॉ/अनिर्णित
  5. शुक्रवार 17 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली वन डे, वानखेडे स्टेडियम मुंबई - भारत 5 विकेट राखून विजयी
  6. रविवार 19 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी वन डे, डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए - व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम - ऑस्ट्रेलिया 10 विकेट राखून विजयी
  7. बुधवार 22 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी वन डे, एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई - ऑस्ट्रेलिया 21 धावांनी विजयी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी