T20 World Cup ऑस्ट्रेलिया विजयी, फायनलमध्ये न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया

Australia won by 5 wickets agianst Pakistan and enter in final टी २० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. दोन्ही विजयी संघांनी आपापली मॅच पाच विकेट राखून जिंकली.

Australia won by 5 wickets agianst Pakistan and enter in final
ऑस्ट्रेलिया विजयी, फायनलमध्ये न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलिया विजयी, फायनलमध्ये न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया
  • पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय
  • दोन्ही विजयी संघांनी आपापली मॅच पाच विकेट राखून जिंकली

Australia won by 5 wickets agianst Pakistan and enter in final । दुबईः टी २० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनल फेरीत एक अनोखा योगायोग दिसला. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. दोन्ही विजयी संघांनी आपापली मॅच पाच विकेट राखून जिंकली. फायनलमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आमनेसामने असतील. फायनल मॅच रविवार १४ नोव्हेंबर २०२१ रोजी दुबईत होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून लाइव्ह टेलिकास्ट (थेट प्रक्षेपण) सुरू होईल.

दुबईत झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने २० ओव्हरमध्ये ४ बाद १७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने १९ ओव्हरमध्ये ५ बाद १७७ धावा करुन मॅच जिंकली. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर मॅथ्यू वेड याने १७ चेंडूत दोन चौकार आणि चार षटकार मारत नाबाद ४१ धावा केल्या. मॅथ्यूने २४१.१८ च्या स्ट्राईक रेटने खेळून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी