अॅशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियाचा कब्जा, तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा मानहानीकारक पराभव

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 28, 2021 | 18:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Australia won ashes series: ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडने दुसऱ्या डावात केवळ चार ओव्हरमध्ये सहा विकेट आपल्या नावावर केल्या. या सामन्यात त्याने एकूण ७ विकेट घेतल्या. त्याला या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा अॅवॉर्ड देण्यात आला. 

australi team ashes series
Ashes: अॅशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियाचा कब्जा, इंग्लंडचा पराभव 
थोडं पण कामाचं
  • तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव
  • मालिकेत ३-०ने विजयी आघाडी
  • एकतर्फी राहिला तिसरा कसोटी सामना

मुंबई: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड क्रिकेट टीम (England Cricket Team) यांच्यातील द अॅशेस(ashes series) या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. ऑस्ट्रेलियाने हा सामना एक डाव आणि १४ धावांनी जिंकला. तसेच या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयी आघाडी घेतली. इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ ६८ धावा करता आल्या. इंग्लंडकडून ज्यो रूटने सर्वाधिक २८ धावा केल्या होत्या. australia won the ashes series after beat england in third match

इंग्लंडची फलंदाजी या सामन्यात पूर्णपणे खालच्या दर्जाची होती. दुसऱ्या डावात ११ पैकी ९ खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. चार फलंदाज तर शून्यावर बाद झाले. मालिकेतील तीनही सामने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडने दुसऱ्ा डावात चार ओव्हरमध्ये सहा विकेट घेतल्या या सामन्यात त्याने मिळून ७ विकेट आपल्या नावे केल्या या सामन्यात त्याला प्लेयर ऑफ दी मॅचचा अॅवॉर्ड देण्यात आला. 

सामन्याबाबत बोलायचे झाल्यास मेलबर्न स्थित मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. या महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव १८५ धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६७ धावा केल्या. संघासाठी सलामी फलंदाज मार्कस हॅरिसने सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले. हॅरिसने आपल्या या खेळीत १८९ चेंडूचा सामना करताना सात चौकार लगावले. 

तिसऱ्या सामन्यादरम्यान आढळले चार कोरोना पॉझिटिव्ह

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना पार पडला.  दुसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास उशिराने सुरू झाला. सामना सुरू होण्याआधी इंग्लंडच्या संघातील ४ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) आढळले आहेत. यात दोन सपोर्ट स्टाफ आणि दोन खेळाडूंच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या चार जणांची नावे जाहीर केलेली नाहीत

वादग्रस्त विकेट

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सची पहिली ओव्हर चांगलीच वादग्रस्त ठरली. स्टोक्सने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील चौथ्या बॉलवर डेविड वॉर्नरला क्लीन बोल्ड केले होते. मात्र टीव्ही रिप्लेमध्ये समोर आले की हा नोबॉल होता. वॉर्नरला अशा पद्धतीने १७ धावांवर जीवनदान मिळाले. मात्र वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा रिप्लेमध्ये पाहिले की स्टोक्सच्य्या त्या ओव्हरमधील पहिले चार बॉलही नोबॉल होते. मात्र अंपायरने त्याच बॉलला नोबॉल दिले ज्यावर वॉर्नर बोल्ड झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी