SL vs AUS: हेझलवूडच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ गारद; पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने घेतली विजयी आघाडी

Australia beat Sri Lanka in 1st T20I । सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. दरम्यान मालिकेतील पहिल्याच सामन्यात जोश हेझलवूड आक्रमक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ गारद झाला आणि कांगारूच्या संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली.

Australia won the first T20 match against Sri Lanka by 10 wickets
जोश हेझलवूडच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ गारद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.
  • जोश हेझलवूडच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ गारद.
  • पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने घेतली विजयी आघाडी.

Australia beat Sri Lanka in 1st T20I । कोलंबो : सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. दरम्यान मालिकेतील पहिल्याच सामन्यात जोश हेझलवूडच्या आक्रमक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ गारद झाला आणि कांगारूच्या संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली. हेझलवूडने ४ षटकांत केवळ १६ धावा देत ४ बळी घेऊन श्रीलंकेच्या फलंदाजीची कंबरच मोडली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवर फलंदाजांनी साजेशी खेळी केली. बदल्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. (Australia won the first T20 match against Sri Lanka by 10 wickets). 

अधिक वाचा : १२वीचा निकाल पाहा एका SMSवर, जाणून घ्या कसा

ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी

तत्पुर्वी, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ १९.३ षटकात १२८ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १४ षटकांत एकही बळी न गमावता या आव्हानाचा पाठलाग केला. १२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी शानदार सुरुवात केली. आरोन फिंचने (६१) आणि डेव्हिड वॉर्नरने (७०) अशी नाबाद खेळी करून पहिल्या सामन्यात आपल्या संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. 

आरोन फिंचने ४० चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ६१ धावा केल्या. तर वॉर्नरने ४४ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा केल्या. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना बुधवारी कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाची शानदार खेळी

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेचे सलामीवीर फलंदाज निसांका आणि गुनाथिलका यांनी पहिल्या बळीसाठी ३९ धावांची भागीदारी केली. दरम्यान गुणथिलका १५ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. येथून निसांका आणि चरित अस्लंका यांनी मिळून धावसंख्या १०० धावांवर नेली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले. निसांका आणि अस्लंका बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या घरासारखा कोसळत गेला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी