AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात कोरोनाचा शिरकाव; मुख्य प्रशिक्षक आयसोलेशनमध्ये

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 01, 2022 | 16:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Australia tour of Sri Lanka 2022 | ऑस्ट्रेलियाच्या संघाला आपल्या आगामी श्रीलंका दौऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा झटका बसला आहे. कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांना आपल्या पहिल्याच दौऱ्यापूर्वी संघापासून वेगळे राहावे लागणार आहे.

Australian coach Andrew McDonald's corona positive before the tour of Sri Lanka
श्रीलंका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात कोरोनाचा शिरकाव   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • श्रीलंका दौऱ्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघात कोरोनाचा शिरकाव.
  • संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड  यांना कोरोनाची लागण झाली आहे.
  • मुख्य प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक प्रशिक्षक मायकेल डी वेनूटो संघाला मार्गदर्शन करतील.

Australia tour of Sri Lanka 2022 | नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या संघाला आपल्या आगामी श्रीलंका दौऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा झटका बसला आहे. कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांना आपल्या पहिल्याच दौऱ्यापूर्वी संघापासून वेगळे राहावे लागणार आहे. कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Australian coach Andrew McDonald's corona positive before the tour of Sri Lanka). 

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी बुधवारी घेण्यात आलेल्या चाचणीत ४० वर्षीय प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. ते आठवडाभर मेलबर्नमध्ये आयसोलेशनमध्ये असतील आणि ८ जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी ते कोलंबोमध्ये संघासोबत सामील होतील. ही माहिती देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, "ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ते आयसोलेशनमधून बाहेर निघाल्यानंतर श्रीलंकेला जाणार आहेत."

अधिक वाचा : वंचितने आक्रमक भूमिका घेताचं चंद्रकांत खैरे मागे हटले

मायकेल डी वेनूटो सांभाळणार धुरा

मुख्य प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक प्रशिक्षक मायकेल डी वेनूटो संघाला मार्गदर्शन करतील. ऑस्ट्रेलिया आणि यजमान श्रीलंकेच्या क्रिकेट संघांमध्ये तीन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिकाही होणार आहे.

७ तारखेपासून रंगणार थरार

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेमधील पहिला टी-२० सामना ७ जून रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा आणि तिसरा टी-२० सामना ८ आणि ११ तारखेला होईल. तर १४, १६, १९, २१ आणि २१ जून रोजी एकदिवसीय सामने खेळवले जातील. दरम्यान पहिला कसोटी सामना २९ जून ते ३ जुलै पर्यंत खेळवला जाईल आणि दुसरी कसोटी ८ ते १२ जुलै दरम्यान होईल. 

  • श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन टी-२० संघ - आरोन फिंच (कर्णधार) शॉन ॲबॉट, ॲश्टन आगर, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड. 
  • श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन एकदिवसीय संघ - आरोन फिंच (कर्णधार), ॲश्टन आगर, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर. 
  • श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन कसोटी संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), ॲश्टन आगर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी