जगातील नंबर वन टेनिसपटूला ऑस्ट्रेलियन सरकार ठरवलं सार्वजनिक धोका, नोव्हाक जोकोविचला दुसऱ्यांदा  घेतले ताब्यात

novak djokovic detention : कोरोना लसीशी संबंधित संपूर्ण प्रकरणावर जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याला ऑस्ट्रेलियातील डिटेन्शन सेंटरमध्ये पाच रात्र काढल्यानंतर मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचा व्हिसा रद्द न करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्याला आता सरकारने दुसऱ्यांदा ताब्यात घेतले आहे.

Australian government declares world number one tennis player a public threat, Novak Djokovic arrested for the second time
जगातील नंबर वन टेनिसपटूला ऑस्ट्रेलियन सरकार ठरवलं सार्वजनिक धोका, नोव्हाक जोकोविचला दुसऱ्यांदा  घेतले ताब्यात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियात दुसऱ्यांदा ताब्यात घेण्यात आले आहे
  • ऑस्ट्रेलियन सरकारने त्याचे वर्णन सार्वजनिक धोका म्हणून केले आहे.
  • जोकोविच लसीकरणाशिवाय ऑस्ट्रेलियात राहू शकतो की नाही हे न्यायालय ठरणार आहे.

मेलबर्न  : जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियात दुसऱ्यांदा ताब्यात (detention) घेण्यात आले आहे. जोकोविचच्या वकिलाने ही माहिती दिली. आता रविवारी ऑस्ट्रेलियातील न्यायालयात त्याची सुनावणी होणार आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने त्याचे वर्णन सार्वजनिक धोका म्हणून केले आहे. आता जोकोविच लसीकरणाशिवाय ऑस्ट्रेलियात (Australian) राहू शकतो की नाही हे न्यायालय ठरवेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉक यांनी नोव्हाक जोकोविचचा व्हिसा (Visa) रद्द केला होता. (Australian government declares world number one tennis player a public threat, Novak Djokovic arrested for the second time)

जोकोविचच्या वकिलाने ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय तर्कहीन असल्याचे म्हटले आहे. याविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली असून, त्यावर रविवारी सुनावणी होणार आहे. जोकोविचला ऑस्ट्रेलिया ओपन खेळायचे असेल तर त्याला सोमवारपर्यंत स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल. जर नोव्हाक कोर्टात केस हरला तर त्याचा व्हिसा रद्द होईल तसेच ऑस्ट्रेलियाच्या व्हिसावरही तीन वर्षांची बंदी येऊ शकते.

कोरोनाची लागण 

ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत येण्यापूर्वी जोकोविचला कोरोनाची लागण झाली होती, असे असतानाही गेल्या महिन्यात त्याने आपल्या देशात सर्बियातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. जोकोविचने ऑस्ट्रेलियात दाखल होण्यासाठी त्याने इमिग्रेशन फॉर्ममध्येही चुका केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियात पोहोचताच त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला.

एक केस जिंकली

यानंतर नोव्हाकने व्हिसा रद्द केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन सरकारविरुद्धचा खटला जिंकला. ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोविचचा व्हिसा मेलबर्न कोर्टाने नाकारला होता. त्याचा पासपोर्ट आणि सरकारने जप्त केलेल्या इतर वस्तू तत्काळ परत कराव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्याने सरावही सुरू केला.


जोकोविचने स्पष्ट केले

जोकोविचने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. तो म्हणाला की, मी जलद चाचण्या केल्या होत्या, ज्याचे निकाल नकारात्मक आले. नंतर माझ्यात कोरोनाची लक्षणे नसतानाही एक चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यामुळे मी खबरदारी घेतली. माझ्या प्रवासाच्या कागदपत्रांमध्ये झालेली चूक माझ्या सपोर्ट टीमने मांडली होती.

जोकोविच पुढे म्हणाला, 'माझा एजंट चुकीचा बॉक्स चिन्हांकित करण्याच्या प्रशासकीय चुकीबद्दल माफी मागतो. ही मानवी चूक आहे आणि नक्कीच हेतुपुरस्सर नाही. या प्रकरणाचे स्पष्टीकरण देण्यासाठी संघाने ऑस्ट्रेलियन सरकारला अतिरिक्त माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी