Double Hat-Trick : या गोलंदाजाने हॅट्रिकच नाहीतर डबल हॅट्रिक घेऊन रचला नवा इतिहास?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 20, 2022 | 16:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

big bash league 2022 | ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू कॅमेरून बॉयसने बिग बॅश लीग मध्ये इतिहास रचला आहे. बॉयस बिग बॅश लीगमध्ये हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज ठरला आहे. मेलबर्न रेनेगेड्स संघाच्या या गोलंदाजाने सिडनी थंडर्सविरूध्दच्या सामन्यात सलग चार चेंडूवर चार बळी पटकावून हा कारनामा आपल्या नावावर केला आहे.

Australian spinner cameron boyce took double hat trick in big bash league and made History
या गोलंदाजाने हॅट्रिकच नाही तर डबल हॅट्रिक घेतली   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कॅमेरून बॉयस बिग बॅश लीगमध्ये हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज ठरला आहे.
  • चार चेंडूवर चार बळी घेऊन कॅमरूनने डबल हॅट्रिक पूर्ण केली.
  • चार चेंडूवर चार बळी घेतल्यावर ऑस्ट्रेलियामध्ये डबल हॅट्रिक बोलले जाते.

big bash league 2022 | नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू कॅमेरून बॉयसने (Cameron Boyce) बिग बॅश लीग (BBL) मध्ये इतिहास रचला आहे. बॉयस बिग बॅश लीगमध्ये हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज ठरला आहे. मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Renegades) संघाच्या या गोलंदाजाने सिडनी थंडर्सविरूध्दच्या (Sydney Thunder) सामन्यात सलग चार चेंडूवर चार बळी पटकावून हा कारनामा आपल्या नावावर केला आहे. एवढेच नाही तर मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून हॅट्रिक घेणार एकमेव गोलंदाज बनला आहे. दरम्यान त्याने हा विक्रम मेलबर्नच्या मैदानावर केला. आपल्या पहिल्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर सर्वात आधी बॉयसने सिडनीचा फलंदाज ॲलेक्स हेल्सला (Alex Hales) बाउंड्री लाइनवर झेलबाद केले. यानंतर त्याने त्याच्या पुढच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जेसन सांघाला (Jason Sangha) बाद केले. लक्षणीय बाब म्हणजे यानंतर त्याच्या पुढच्या चेंडूवर कॅमरनने ॲलेक्स रॉसला एलबीडब्ल्यू (LBW) करून संघाला पहिली हॅट्रिक मिळवून दिली. (Australian spinner cameron boyce took double hat trick in big bash league and made History).

दरम्यान, सलग तीन चेंडूवर तीन बळी पटकावल्यानंतर देखील कॅमरून थांबला नाही. त्याने पुढच्याच चेंडूवर ऑलराउंडर डेनियल सॅम्सला एलबीडब्ल्यू करून ते करून दाखवले जे आतापर्यंत बीबीएलच्या इतिहास झाले नव्हते. म्हणजेच चार चेंडूवर चार बळी घेऊन कॅमरूनने डबल हॅट्रिक पूर्ण केली. लक्षणीय म्हणजे चार चेंडूवर चार बळी घेतल्यावर ऑस्ट्रेलियामध्ये डबल हॅट्रिक बोलले जाते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये बोलले जाते की, सुरूवातीचे तीन बळी मिळवून देखील एक हॅट्रिक पूर्ण होती आणि शेवटचे तीन बळी मिळवून देखील एक हॅट्रिक पूर्ण होते.

आपले तिसरे षटक करायला आलेल्या बॉयसने पहिल्याच चेंडूवर बळी घेत पाच बळी घेण्याचा विक्रम पूर्ण केला. यावेळी त्याचा बळी ठरला तो विकेटकिपर फलंदाज मॅथ्यू जाईल्स. यावेळी बॉयसने केवळ १३ चेंडूत सात धावा देऊन पाच बळी घेतले होते. यानंतर त्याने सिडनीचा आक्रमक ऑलराउंडर बेन कटिंगलाही त्याच्याच गोलंदाजीवर धावबाद केले. महत्त्वाचे म्हणजे बॉयसने सिडनीच्या फंलदाजीची फळीच मोडीत काढली कारण सामन्याच्या सुरूवातीला सिडनी संघाने एकही बळी न गमावता ८० धावा केल्या होत्या. पण बॉयसच्या या दोन षटकांनंतर त्याची धावसंख्या ९३ धावांत ५ बाद अशी झाली. सिडनीकडून हेल्स आणि उस्मान ख्वाजा यांनी शानदार फलंदाजी करत केवळ पॉवरप्लेमध्ये ७५ धावा केल्या होत्या.

सामन्यात काय घडले

लक्षणीय बाब म्हणजे कॅमेरून बॉयसच्या या विक्रमी खेळीनंतर देखील त्याच्या संघाला विजय मिळवता आला नाही. जर तरच्या सामन्यात सिडनीच्या संघाने  १ धाव राखून मेलबर्नच्या संघाला पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना सिडनीच्या संघाने २० षटकात १७० धावा केल्या होत्या. ज्यामध्ये हेल्सच्या ४४ आणि ख्वाजाच्या ७७ धावांचा समावेश होता. प्रत्युत्तर देताना मेलबर्नच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली आणि संघाने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर आपला पहिला गडी गमावला. मात्र कर्णधार आरोन फिंचने शानदार ८२ धावांची खेळी केली पण तो देखील आपल्या संघाला विजयी करू शकला नाही. यंदाच्या हंगामात भारताचा उन्मुक्त चंद देखील मेलबर्नच्या संघात खेळत आहे. फिंचनंतर त्याने या सामन्यात आपल्या संघासाठी सर्वाधिक २९ धावा केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी