मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना भारतासाठी(india vs south africa t-20 match) निराशाजनक ठरला. या सामन्यात चांगला स्कोर करूनही पराभवास सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खानने(avesh khan) आपल्या गोलंदाजीच्या वेगाने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आवेश खानने आपल्या घातक गोलंदाजीने आफ्रिकेचा फलंदाज रासी वॅन डेर डुसैनची(rassie van der dussen) बॅटच तोडली.avesh khan speeding ball broke van der dussain bat in match
अधिक वाचा - अहमदनगर मध्ये बंद पाळून पादचारी मार्गावर चिटकवले नुपूर शर्मा
आपल्या बॅटची झालेली ही हालत पाहून रासी वॅन डेर डुसैन पाहतच राहिला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. द. आफ्रिकेच्या डावाच्या १४व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आवेश खान गोलंदाजीसाठी आला.
pic.twitter.com/ebuth29vKQ — vikki thakur (@vikkith73274828) June 10, 2022
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आवेश खान १४व्या ओव्हरच्या तिसरा बॉल इतक्या वेगाने फेकला की आफ्रिकेचा फलंदाज रासी वॅन डेर डुसेनची बॅट तो बॉल झेलू शकला नाही आणि बॅटचे दोन तुकडे झाले.
यानंतर रासी वॅन डेर डुसैनला आपला तुटलेली बॅट बदलावी लागली. आवेश खान १४० Kmphपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करतो. या सामन्यात आवेश खानने ४ ओव्हरमध्ये ३५ धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळवता आला नाही.
आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा निराशाजनक पराभव झाला. २११ धावांचा विशाल स्कोर उभा करूनही आफ्रिकेने ५ बॉल राखत विजय मिळवला. आफ्रिकेच्या विजयात डेविड मिलर आणि वॅन डेर डुसैन चमकले.
अधिक वाचा - वॉरेन बफेने केली शेअर बाजाराबद्दल भविष्यवाणी, दणाणले धाबे
डुसैनच्या व्यतिरिक्त मिलरनेही द. आफ्रिकेच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मिलरने भारताविरुद्धच्या या सामन्यात मिलरने २२ चेंडूवर तुफानी अर्धशतक ठोकत ३१ बॉलमध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६४ धावांची नाबाद खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वर्षांनी मिलरचे हे किलर रूप पाहायला मिळाले.