Ind vs WI: एकाच सामन्यात झिरोवरून हिरो बनला टीम इंडियाचा हा ऑलराऊंडर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 25, 2022 | 12:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team india: टीम इंडियाने या सामना रोमांचक स्थितीत दोन विकेटनी जिंकला. या विजयाचा हिरो हा ऑलराऊंडर ठरला.

india vs west indies
एकाच सामन्यात झिरोवरून हिरो बनला टीम इंडियाचा हा ऑलराऊंडर 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाच्या विजयाचा हिरो
  • एकट्याच्या जीवावर जिंकवून दिला सामना
  • दुसऱ्या वनडेत बनला प्लेयर ऑफ दी मॅच

मुंबई: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज(India vs west indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील(one day series) दुसरा सामना २४ जुलैला पोर्ट ऑफ स्पेनच्या(port of spain) क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाच्या घातक ऑलराऊंडरची कामगिरी जबरदस्त राहिली. टीम इंडियाने(team india) या सामना रोमांचक स्थितीत दोन विकेटनी जिंकला. या विजयाचा हिरो हा ऑलराऊंडर ठरला. सातत्याने खराब कामगिरीमुळे चाहत्यांना वाटले होते की या खेळाडूचे करिअर आता संपले आहे. Axar patel became hero from zero in match against west indies

अधिक वाचा - कॅन्टीनमध्ये गेले म्हणून वाचले..नाहीतर झाला असता मोठा अपघात

झिरोवरून हिरो बनला हा क्रिकेटर

टीम इंडियाने दुरा सामन्यात ३१२ धावांचे लक्ष्य गाठत जबरदस्त विजय मिळवला आणि मालिकाही आपल्या नावे केली. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयामागे सगळ्यात मोठा हात होता ऑलराऊंडर अक्षर पटेलचा. गेल्या काही सामन्यांमध्ये अक्षर पटेलची कामगिरी खराब राहिली होती. त्यामुळे चाहत्यांना वाटले की तो संघाबाहेर जाऊ शकतो. मात्र या सामन्यात त्याने टीम इंडियाला हरलेला सामना जिंकून दिला. 

विंडीजच्या गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

अक्षऱ पटेल जेव्हा या सामन्यात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा टीम इंडियाने २०५ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. अशातच हा सामना हातातून निसटेल असे वाटत होते. या मोक्याच्या क्षणी अक्षऱ पटेलने एक मॅचविनिंग खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अक्षर पटेलने ३५ चेंडूत नाबाद ६४ धावांची खेळी करत विंडीजच्या हातून विजय खेचून आणला. या डावात त्याने १८२.८५च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ३ चौकार आणि ५ जबरदस्त षटकार ठोकले. 

अधिक वाचा - पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकून दिला सामना

टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ८ धावांची गरज होती. या ओव्हरमधील पहिला बॉल असाच राहिला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर १-१ धाव बनली. हा सामना खूप रोमहर्षक राहिला होता. टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात विजयासाठी ३ बॉलवर ६ धावांची गरज होती तेव्हा अक्षऱ पटेलने ओव्हरच्या चौथ्या बॉलवर षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात अक्षर पटेलने गोलंदाजी करताना ९ ओव्हरमध्ये केवळ ४० धावा देत एक विकेट मिळवल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी