IPLमध्ये अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी, 100 हून अधिक विकेट्स घेणारा जगातील चौथा खेळाडू

पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या अक्षर पटेल (Axar Patel) याने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. अक्षर आयपीएलमध्ये 1000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स घेणारा जगातील 4 था अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. 

Akshar Patel's all-round performance in IPL
IPLमध्ये 100 हून अधिक विकेट्स घेणारा अक्षर ठरला चौथा खेळाडू   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अक्षरने नाबाद 17 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली शिवाय रिषी धवनची विकेटही घेतली होती.
  • अक्षरने आयपीएलमध्ये 1000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स पूर्ण केल्या
  • अक्षर 121 सामन्यातील 120 डावात 101 विकेट्स घेतल्या

IPL 2022 : पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या अक्षर पटेल (Axar Patel) याने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. अक्षर आयपीएलमध्ये 1000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स घेणारा जगातील 4 था अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. 
नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये (DY Patil Stadium) सोमवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात सामना पार पडला. आयपीएल 2022 च्या या 64 व्या सामन्यात दिल्लीने पंजाबवर 17 धावांनी विजय मिळवला.

दरम्यान सामन्यात दिल्लीच्या अक्षरने नाबाद 17 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली शिवाय रिषी धवनची विकेटही घेतली होती. त्याने केलेल्या या कामगिरीमुळे अक्षरने आयपीएलमध्ये 1000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स पूर्ण केल्या आहेत. अक्षरच्या आधी केवळ तीनच खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. त्यात रवींद्र जाडेजा हा एकमेवल भारतीय आहे. तर ड्वेन ब्राव्हो आणि सुनील नारायण हे परदेशी   खेळाडूंचाही समावेश आहे. 

अक्षरची आयपीएलमधील कामगिरी

आजवर अक्षर पटेलने आयपीएलमध्ये 121 सामने खेळले आहेत. त्यातील 87 डावात त्याने 18.92 च्या सरासरीने 1116 धावा केल्या आहेत. 44 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. याशिवाय त्याने 121 सामन्यातील 120 डावात 101 विकेट्स घेतल्या आहेत. 21 धावा देत 4 विकेट्स घेणं त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

दिल्लीचा विजय

दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजांनी गुढघे टेकले. दिल्लीकडून शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) उत्कृष्ट गोलंदाजी केली. ज्यामुळं अतितटीच्या सामन्यात दिल्लीच्या संघानं 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून पंजाबसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघाला 20 षटकात 142 धावाचं करता आल्या. पंजाबकडून जितेश शर्मानं (Jitesh Sharma) सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी