शेवटच्या षटकात अक्षर पटेलचा उत्तुंग षटकार; वेस्ट इंडिजच्या Hope सह मोडला धोनीचा 17 वर्ष जुना विक्रम

टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ODI match) वेस्ट इंडिजचा (West Indies) 2 गडी राखून पराभव केला. यासह भारताने (India) तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अक्षर पटेलच्या (Axar Patel ) धमाकेदार फलंदाजीमुळे (Batting) वेस्ट इंडिजने (West Indies) रविवारी मालिकेतील आणखी एक सामना गमावला.

Akshar Patel's huge six broke Dhoni's old record
अक्षर पटेलच्या उत्तुंग षटकारनं मोडला धोनीचा जुना विक्रम   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • पटेलनं शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाला जिंकवून दिलं.
  • अक्षर पटेलने 128.86 या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली.
  • 35 चेंडूत 64 धावांच्या नाबाद खेळीसह अक्षरने धोनीचा एकदिवसीय क्रिकेटमधील दीर्घकाळाचा विक्रम मोडला.

India Vs West Indies 2nd ODI: टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ODI match) वेस्ट इंडिजचा (West Indies) 2 गडी राखून पराभव केला. यासह भारताने (India) तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अक्षर पटेलच्या (Axar Patel ) धमाकेदार फलंदाजीमुळे (Batting) वेस्ट इंडिजने (West Indies) रविवारी मालिकेतील आणखी एक सामना गमावला.

दरम्यान कालचा सामना वेस्ट इंडिजसाठी सुरुवातीला शानदार होता. या सामन्यात शाय होपने शंभराव्या एकदिवशीय सामन्यात शतक केलं होतं. कर्णधार निकोलस पूरनच्या प्रभावी 74 धावा केल्या होत्या. परंतु भारताने हा सामना जिंकल्यानं पूरन आणि होपच्या धावा व्यर्थ ठरल्या. पण या खेळात अक्षर पटेलनं मोठी कमाल करत अनेक दिग्गजांना थक्क करुन सोडलं आहे. पटेल विंडीजविरुद्ध सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 312 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना अक्षर पटेलनं शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाला जिंकवून दिलं. या विजयासह भारताने नवा विक्रम केला तर स्वत अक्षर पटेलनं शेवटच्या षटकात उत्तुंग षटकार लगावत एमएस धोनीचा 17 वर्ष पूर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे. 

आपल्या खेळीविषयी आणि टीम इंडियाच्या विजयाबाबत बोलताना अक्षर म्हणाल की, "मला वाटतं की ही एक खास गोष्ट आहे. एका महत्त्वाच्या वेळी फलंदाजीसाठी आलो आणि संघाला मालिका जिंकण्यास मदत केली. आम्ही आयपीएलमध्येही तेच केले आहे. आम्हाला फक्त शांत राहण्याची आणि तीव्रता टिकवून ठेवण्याची गरज होती. मी खेळत होतो. जवळपास 5 वर्षांनंतर एकदिवसीय सामना खेळत आहे. मला माझ्या संघासाठी अशीच कामगिरी करत राहायचे आहे, असे अक्षर सामन्यानंतर म्हणाला. 

Read Also : वारे व्वा ! कार्यकाळ संपल्यानंतरही माजी राष्ट्रपतींची मज्जा

 18 व्या षटकात भारताची 79 धावांवर तीन बाद अशी स्थिती असताना  श्रेयस अय्यर (63) आणि संजू सॅमसन (54) यांनी आपापल्या अर्धशतकांसह 99 धावांची भागीदारी करून भारताला सावरण्यास मदत केली. त्यानंतर दीपक हुडा (33) आणि अक्षर यांनी वेगवान पन्नास धावांची भागीदारी रचून वेस्ट इंडिजला दाखवलं की भारताची आव्हान पूर्ण करण्याची ताकद अजून शिल्लक आहे. 

अक्षर पटेलची कामगिरी

वेस्ट-इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात अक्षर पटेलने 128.86 या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली. टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ८ धावांची गरज होती. या ओव्हरमधील पहिला बॉल असाच राहिला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर 1-1 धाव बनली. पटेलने 3 चौकार आणि पाच षटकार आणि  त्यानंतर आवेश खानच्या दुहेरी चौकारांसह समीकरण 3 चेंडूत 6 झाले होते. म्हणजेच भारताला सामना जिंकण्यासाठी तीन चेंडूत 6 धावा करायच्या होत्या. तेव्हा अक्षऱ पटेलने ओव्हरच्या चौथ्या बॉलवर षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Read Also : पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

धोनीचा विक्रम

35 चेंडूत 64 धावांच्या नाबाद खेळीसह अक्षरने धोनीचा एकदिवसीय क्रिकेटमधील दीर्घकाळाचा विक्रम मोडला. आव्हानाचा पाठलाग करताना पटेलने नंबर सातच्या स्थानी फलंदाजीला येत पाच षटकार लगावले आहेत. परंतु या क्रमांकावर आव्हानाचा पाठलाग बहुतेक वेळात यशस्वी होत नाही. 2005 मध्ये भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने तीन षटकार मारले होते. तर युसूफ पठाणने 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्ध दोन वेळा धोनीच्या बरोबरी केली होती.

Read Also : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

शाई होपची कमाल

शाई होप आपल्या 100व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा जगातील 10वा फलंदाज ठरला. त्याच्या आधी गॉर्डन ग्रीनिज, ख्रिस केनर्स, मोहम्मद युसूफ, कुमार संगकारा, ख्रिस गेल, मार्कस ट्रेस्कोथिक, रामनरेश सरवन, डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी हा पराक्रम केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी