मुंबई: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम(pakistan captain babar azam) क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये धमाकेदार खेळी करत आहे. तो एकापाठोपाठ एक रेकॉर्ड उद्ध्वस्त करत आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे(virat kohli) अनेक रेकॉर्ड मागे टाकले आहेत. आता त्याने आयसीसी टी-२० फलंदाजीच्या रँकिंगम्ये असा एक रेकॉर्ड बनवला आहे जो भल्या भल्या फलंदाजांना तोडणे मुश्किल असते. Babar azam break new record of virat kohli
अधिक वाचा - उदयपूरच्या घटनेवर स्वरा भास्करचे ट्विट
टी-२० रँकिंगमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या स्थानावर कायम राहण्याच्या बाबतीत तो पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने लेटेस्ट रँकिंगमध्ये विराट कोहली दीर्घकाळापर्यंत पहिले स्थान कायम राखण्याचा रेकॉर्ड तोडला आहे.
भारताचा स्टार विराट कोहली गेल्या एका दशतकांत एकूण १०१३ दिवसांसाठी पहिल्या स्थानावरील टी-२० फलंदाज होता मात्र पहिल्या स्थानावर बराच काळ नंबर १च्या स्थानावर राहण्यात बाबरने दिवसांचा रेकॉर्ड मोडला.
पाकिस्तानचा कर्णधार वर्तमानात टी-२० आणि वनडेमध्ये नंबर १ फलंदाज म्हणून नोंद झाली आणि त्याने नुकतेच विधान करताना म्हटले होते की त्याला खेळाच्या तीनही फॉरमॅटमध्ये सर्वोच्च स्थान गाठायचे आहे.
अधिक वाचा - शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम
मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये त्याचा जबरदस्त फॉर्म आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम वनडे रँकिंगमध्ये वरच्या स्थानावर आहे. तो दुसऱ्या स्थानावरी इमाम उल हक आणि तिसऱ्या स्थानावर विराट कोहलीपेक्षा पुढे आहे. टी-२० रँकिंगमध्ये बाबरचा साथीदार आणि गेल्या वर्षीची आयसीसी टी-२० प्लेयर ऑफ दी इयर मोहम्मद रिझवान रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानार आहे. या यशानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचे कौतुक करत म्हटले होते की बाबर पाकिस्तानचा गौरव करत आहे.