IND vs PAK: पाकिस्तानच्या विजयानंतर कर्णधार बाबरच्या वडिलांना अश्रू अनावर, व्हिडिओ व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 25, 2021 | 16:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Babar Azam's father Viral Video: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्णधार बाबर आझमच्या वडिलांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

babar azam
IND vs PAK: पाकच्या विजयानंतर बाबरच्या वडिलांना अश्रू अनावर 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानने भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. 
  • पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध पहिल्यांदाच विजय मिळवला. 
  • या सामन्यादरम्यान बाबर आझमचे वडील स्टेडिययमध्ये होते. 

दुबई: विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या टीम इंडियाची टी-२० वर्ल्डकपमधील सुरूवात खराब झाली. भारताला सुपर १२ राऊंडच्या पहिल्या सामन्यातच पाकिस्तानकडून १० विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी दुबईच्या आंतराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताला सुरूवाती धक्के बसल्यानंतर त्यांना ७ विकेट १५१ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम(५२ बॉलमध्ये ६८) आणि मोहम्मद रिझवा(५५ बॉलमध्ये ७९) यांनी शानदार फलंदाजी केली आणि १७.५ ओव्हरमध्ये कोणताही विकेट न गमावता आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 

बाबरच्या वडिलांना अश्रू अनावर

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आलेले कर्णधार बाबर आजमचे वडील आझम सिद्दीकीही दुबईच्या स्टेडिययमध्ये होते. सिद्दीकी यांनी स्टँड्समध्ये बसून महामुकाबल्याचा आनंद घेतला. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानच्यास संघाने विजय मिळवल्यानंतर सिद्दीकी खूपच भावूक झाले. आनंदाने त्यांना अश्रू अनावर झाले. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की बाबरचे वडील बसलेले आहेत आणि लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. या दरम्यान, सिद्दीकी आपल्या हातांनी अश्रू पुसताना दिसत आहेत. 

पाकिस्तानने भारताविरुद्दच्या महामुकाबल्यात टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेता होता. यानंतर बाबर आझमने आपल्या गोलंदाजांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला आणि सुरूवातीपासूनच भारतीय संघाला दबावात ठेवले. टीम इंडियाचा स्कोर एका वेळेस तीन बाद ३१ धावा असा होता. यावेळई चौथ्या विकेटसाठी विराट कोहली ४९ चेंडूत ५७ आणि ऋषभ पंत ३० चेंडूत ३९ धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. यामुळे भारताला दीडशेचा टप्पा गाठता आला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी