Video: बाबर आझमच्या मिस्ट्री बॉलवर अडकला बांगलादेशी फलंदाज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 09, 2021 | 14:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bangladesh vs Pakistan, 2nd Test: ढाकामध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने कमाल करत बांगलादेशला एक डाव आणि ८ धावांनी हरवले. 

pak vs ban
Video: बाबर आझमच्या मिस्ट्री बॉलवर अडकला बांगलादेशी फलंदाज 
थोडं पण कामाचं
  • दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने बांगलादेशला हरवले. 
  • साजिन खान बनला मॅन ऑफ दी मॅच
  • बाबर आझमने गोलंदाजीने केली कमाल

मुंबई: ढाकामध्ये(dhaka) खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने(pakistan) जबरदस्त कामगिरी केली आणि बांगलादेशला(bangladesh) एक डाव आणि ८ धावांनी हरवले. पावसाने आधीच फटका पडलेल्या सामन्याचा अखेरचा दिवस रोमहर्षक झाला होता. एकावेळेच बांगलादेशचा संघ कसोटी सामना वाचवण्याच्या जवळ पोहोचला होता. मात्र पाकिस्तानी स्पिनर साजिद खानने तैजुल इस्लामला एलबीडब्लू बाद करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. खरंतर पाचव्या दिवसाचा खेळ थोडा शिल्लक होता. असं वाटतं होतं की बांगलादेश सामना अनिर्णीत राखेल. मात्र साजिदने आपल्या फिरकीने कमाल केली आणि पाकिस्तानला एक डाव आणि ८ धावांनी विजय मिळवून दिला. Babar Azam first international wicket in match against Bangladesh

बांगलादेशचा पहिला डाव ८७ धावांवर संपला. त्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशला फॉलोऑन दिला. एका वेळेस मुशफिकुर रहीम, लिटन दास आणि शाकिब अल हसन क्रीझवर टिकून राहिल्याने पाकिस्तानच्या विजयाच्या आशा काही वेळासाठी संपल्या होत्या. मात्र दुर्भाग्याने रहीम रन आऊट झाला आणि यानंतर साजिदने आपल्या फिरकीचा जलवा दाखवत लिटन दास आणि शाकिबला बाद करत सामन्याचे चित्रच पालटले. 

बाबरने घेतली पहिली विकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पहिली विकेट मिळवत पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बाबरने मेहदी हसनला एलबीडब्लू बाद केले ज्यामुळे सामन्याचे चित्र पालटले. मेहदीने १४ धावांची खेळी केली. जेव्हा तो खेळत होत तेव्हा असं वाटतं होत की तो सामना वाचवेल. मात्र बाबरने आपल्या फिरकीची कमाल केली आणि बांगलादेश खेळाडूला एलबीडब्लू केले आणि पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. हा महत्त्वाचा विकेट घेतल्यानंतर बाबरचा आनंद काही गगनात मावत नव्हता. सोशल मीडियावर बाबरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्याचा आनंदाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी