PAK vs WI: बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने तोडला रोहित-शिखरचा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 17, 2021 | 14:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

babar-rizwan breaks rohit-shikhar world record: बाबर आणि रिझवानने पहिल्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी केली. यामुळे पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध सात विकेट राखून विजय मिळवता आला.

pak cricketers
बाबर आझम- मोहम्मद रिझवानने तोडला रोहित-शिखरचा वर्ल्ड रेकॉर्ड 
थोडं पण कामाचं
  • टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आता एकट्या बाबर आणि रिझवानच्या नावावर आहे.
  • आधी हा रेकॉर्ड संयुक्तपणे तीन जोडी पहिल्या नंबरवर होती.
  • वेस्ट इंडिजविरुद्ध गुरूवारी खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात बाबर आणि रिझवानने पाचव्या पहिल्या विकेटसाठी १००पेक्षा जास्त भागीदारी केली.

मुंबई: पाकिस्ताना सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान(mohammad rizwann and babar azam) आणि बाबर आझम यांनी मिळून टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये(t-20 international record) एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. या जोडीने भारताचे सलामीवीर रोहित शर्मा(rohit sharma) आणि शिखर धवन(shikhar dhawan) आणि रोहित शर्मा-लोकेश राहुलच्या जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आता एकट्या बाबर आणि रिझवानच्या नावावर आहे. आधी हा रेकॉर्ड संयुक्तपणे तीन जोडी पहिल्या नंबरवर होती. वेस्ट इंडिजविरुद्ध गुरूवारी खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात बाबर आणि रिझवानने पाचव्या पहिल्या विकेटसाठी १००पेक्षा जास्त भागीदारी केली. रोहित-धवन आणि रोहित राहुल यांच्या जोडीने चार चार वेळा असे केले आहे. 

बाबर आणि रिझवानने पहिल्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी केली. यामुळे पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध सात विकेट राखून विजय मिळवता आला. या पद्धतीने पाकिस्तानने घरगुती टी-२० मालिकेतत ३-०ने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिले. कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना तीन बाद २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १८.५ ओव्हरमध्ये तीन बाद २०८ धावा केल्या आणि सामना जिंकला. 

या सामन्यात रिझवानने ८७ तर बाबरने ७९ धावा केल्या. रिझवानने ४५ चेंडूत ही खेळी केली. त्याने या दरम्यान १० चौकार आणि तीन षटकार ठोकले. या खेळीसाठी रिझवानला मॅन ऑफ दी मॅच निवडण्यात आले. या संपूर्ण सीरिजदरम्यान त्याची बॅट खूप तळपली आणि याचमुळे त्याला मॅन ऑफ दी सीरिज निवडण्यात आले. 

भारताविरुद्धच्या विजयात जोडीचा मोलाचा वाटा

टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध दारूण पराभवास सामोरे जावे लागले होते. या विजयात या जोडीचा मोलाचा वाटा होता.  या दोघांच्या जबरदस्त भागीदारीमुळेच पाकिस्तानला तब्बल २९ वर्षांनी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरुद्ध विजय मिळवता आला. भारताविरुद्धच्या सामन्यात दोघांनी १५२ धावांची भागीदारी केली होती. यात रिझवानने ५५ चेंडूत ७९ तर बाबरने ५२ चेंडूत ६८ धावांची खेळी केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी