babar vs virat: बाबर आझमने पुन्हा विराटला टाकले मागे

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 03, 2021 | 13:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने पुन्हा एकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. 

virat kohli- babar azam
babar vs virat: बाबर आझमने पुन्हा विराटला टाकले मागे 
थोडं पण कामाचं
  • आपल्या या खेळीदरम्यान त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला आणखी एका बाबतीत मागे टाकले आहे
  • एका वर्षात टी-२० फॉरमॅटमध्ये एक हजार धावा पूर्ण करणारा पहिला कर्णधार बनला आहे.
  • या रेकॉर्डजवळ न्यूझीलंडचा केन विल्यमसन्स पोहोचला होता. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. 

मुंबई: कर्णधार बाबर आझमच्या(captain babar azam) नेतृत्वाखाली पाकिस्तानने(pakistan) रविवारी टी-२० वर्ल्डकपच्या(t-20 world cup) सुपर १२ राऊंडमध्ये नामिबियाला सोप्या पद्धतीने ४५ धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. संघाला विजय मिळवून देण्यात बाबरने महत्त्वाची भूमिका साकारली. त्याने ४९ चेंडूत ७० धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच्या या खेळीत सात चौकार सामील होते. Babar azam scores 1000 plus run in t-20 format in one year

आपल्या या खेळीदरम्यान त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला आणखी एका बाबतीत मागे टाकले आहे आणि एका वर्षात टी-२० फॉरमॅटमध्ये एक हजार धावा पूर्ण करणारा पहिला कर्णधार बनला आहे. या रेकॉर्डजवळ न्यूझीलंडचा केन विल्यमसन्स पोहोचला होता. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. 

विल्यमसन्सने २०१८मध्ये ९८६ धावा केल्या होत्या. या एका वर्षातील सर्वाधिक धावा होत्या. याशिवाय विराट २०१६मध्ये ९७३ आणि २०१९मध्ये ९३० धावा केल्या होत्या. मात्र त्याला एक हजार धावा पूर्ण करता आल्या नव्हत्या. या दोन्ही खेळाडूंव्यतिरिक्त २०१६मध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने ९०१ धावा केल्या होत्या. 

बाबरची रिझवानसोबत शतकीय भागीदारी

यूएई आणि ओमानमद्ये खेळवल्या जात असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची जोडी जबरदस्त मानली जात आहे. दोघांनी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला सोडून प्रत्येक सामन्यात चांगली सुरूवात दिली. या दोघांच्या जबरदस्त भागीदारीमुळेच पाकिस्तानला तब्बल २९ वर्षांनी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरुद्ध विजय मिळवता आला. भारताविरुद्धच्या सामन्यात दोघांनी १५२ धावांची भागीदारी केली होती. यात रिझवानने ५५ चेंडूत ७९ तर बाबरने ५२ चेंडूत ६८ धावांची खेळी केली होती. 

 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी