Babar Azam: बाबर आझमचे इंग्लिश ऐकून तुमचे डोके नक्की दुखेल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 29, 2022 | 12:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Babar Azam: पाकिस्तान क्रिकेट संघासाठी टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणे आता अतिशय कठीण झाले आहे. त्यांना टी20 वर्ल्ड कपमध्ये सलग दोन पराभव सहन करावे लागले.

babar azam
Babar Azam: बाबर आझमचे इंग्लिश ऐकून तुमचे डोके नक्की दुखेल 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानच्या संघाने टी20 वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकलेला नाही.
  • पहिल्या सामन्यात भारताने हरवले तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेकडून हार पत्करावी लागली.
  • आता त्यांना उरलेले तीनही सामने जिंकावे लागतील.

मुंबई: यंदाचा टी20 वर्ल्ड कप(t-20 world cup) पाकिस्तानी संघासाठी अतिशय कठीण दिसत आहे. आधी भारताविरुद्धच्या(india) सामन्यात एका धावेने पराभव त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध अटीतटीच्या सामन्यातही पराभव. सलग दोन पराभवामुळे पाकिस्तानचा संघ चांगलाच कोलमडला आहे. पाकिस्तानी संघामध्ये आता आत्मविश्वास भरण्याची गरज आहे. तरच ते पुढील सामन्यांसाठी सज्ज होऊ शकतील आणि उरलेल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकतील. Babar azam trolled over english spelling

अधिक वाचा - गुलाबी थंडीत 'या' चहानं करा दिवसाची सुरुवात, वाढेल इम्युनिटी

दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम संघाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र पाकिस्तानी क्रिकेटरचे इंग्लिश बोलणे हे नक्कीच हास्यास्पद असते. सामन्यानंत कमेंटेटरशी बातचीत करणे असो वा सोशल मीडियावर काहीतरी लिहिणे असो, पाकिस्तानचे क्रिकेटर अनेकदा ट्रोल असतो. यातच आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. त्याचे सात वर्षांपूर्वीचे जुने ट्वीट लोकांनी शोधून काढले असन त्यात त्याने झिम्बाब्वेची स्पेलिंगही ठीक लिहिलेली नाही. विशेष म्हणजे,  झिम्बाब्वेने टी20 वर्ल्ड कप सामन्यात पाकिस्तानला हरवले आणि अनेक युजर्स या पराभवाला त्याच्याशी जोडत आहेत. 

पाकिस्तानसाठी कठीण

पाकिस्तानच्या संघाने टी20 वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकलेला नाही. पहिल्या सामन्यात भारताने हरवले तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेकडून हार पत्करावी लागली. आता त्यांना उरलेले तीनही सामने जिंकावे लागतील. तसेच दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. 

अधिक वाचा - मुंबईत गेल्या 5 वर्षांत दिवाळीत सर्वाधिक भाजल्याच्या घटना

बाबर आझम झाला ट्रोल

बाबर आझमचे सात वर्षांपूर्वीचे एक ट्वीट व्हायरल झाले आहे. यात बाबरने इंग्लिशमध्ये वेलकम झिम्बाब्वे म्हटले आहे. बाबर यात झिम्बाब्वेची स्पेलिंग चुकीची लिहिली आहे. यामुळे तो चांगलाच ट्रोल झाला आहे. झिम्बाब्वेने पाकिस्तानसारख्या मजबूत मानल्या जाणाऱ्या संघाला हरवले.यामुळे ट्रोलर्सना आणखीनच कारण भेटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी