आपल्याच चुलत बहिणीशी लग्न करणार हा क्रिकेटर, याआधीही या क्रिकेटर्सनी केले आहे असे लग्न

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 03, 2021 | 13:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

बाबर आझम आपली चुलत बहीणीशी साखरपुडा केला आहे. ही काही पहिलीच वेळ नाही की एखाद्या क्रिकेटरने आपल्या चुलत बहिणीशी लग्न केले. या लिस्टमध्ये अनेक नावे आहेत. 

marriage
आपल्याच चुलत बहिणीशी लग्न करणारा हा क्रिकेटर 

थोडं पण कामाचं

  • बाबर आझम आपल्या चुलत बहिणीशी लग्न करणार.
  • अनेक क्रिकेटर्सनी आपल्या चुलत बहिणीशी लग्न केले आहे. 
  • या लिस्टमध्ये अनेक क्रिकेटर्सची नावे आहेत. 

मुंबई: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम(Babar Azam) पुढील वर्षी लग्नगाठ बांधत आहे. हैराणजनक बाब म्हणजे बाबर आझमम आपल्याच चुलत बहिणीशी लग्न करणार आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि त्याची चुलत बहीण यांच्या कुटुंबामध्ये या लग्नासाठी परवानगी देण्यात आली आहे. दोघेही पुढील वर्षी लग्न करतील. (babar azam will marry with his cousin sister)

Babar Azam

बाबर आझमने आपल्या चुलत बहिणीशी साखरपुडा केला आहे. ही काही पहिलीच वेळ नाही की एखाद्या क्रिकेटरने आपल्या चुलत बहिणीशी लग्न केले. या लिस्टमध्ये अनेक नावे आहेत. टाकूया यावर एक नजर

शाहीद आणि नादिया

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने २०व्या वयातच आपल्या मामाच्या मुलीशी नादियाशी निकाह केला होता. तेव्हापासून ते गेल्या १९ वर्षांपासून एकत्र आहेत. नादिया खूपच रिझर्व्ह्ड आहे. तिला शाहिदसोबत सामन्यादरम्यान पाहिले गेलेले नाही. शाहिद आफ्रिदीने २२ ऑक्टोबर २०२०मध्ये नादियासोबत लग्न केले होते. नात्याने ही त्याची मामेबहीण आहे. नादिया ही शाहिदच्या सख्ख्या मामाची मुलगी आहे. शाहिद आणि नादिया यांना अक्सा, अंशा, अजवा, असमारा आणि अरवा या ५ मुली आहेत. 

मुस्तफिझुर रेहमान आणि समिया परवीन

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रेहमान आणि समिया परवीन यांचे लग्न २०१९मध्ये मार्च महिन्यात झाले होते. 

मोसेद्देक हुसैन आणि शरमीन समीरा

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

बांगलादेश क्रिकेट संघाचा युवा क्रिकेटर मोसद्देक हुसैनने २०१२मद्ये आपली चुलत बहीण शरमीन समीराशी लग्न केले. मोसद्देक हुसैन आपल्या पर्सनल लाईफमुळे चांगलाच चर्चेत होता. त्याच्यावर पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप होता. यामुळे मोसद्देकला आपल्या संघातील स्थानही गमवावे लागले होते. 

सईद अन्वर आणि लुबना

(फोटो सौजन्य - टाईम्स ऑफ इंडिया)

१९९६मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर सईद अन्वरने आपली चुलत बहीण लुबनाशी लग्न केले होते. लुबना पेशाने डॉक्टर आहे. योगायोग म्हणजे त्याच वर्षी सईद कसोटीमध्ये आपला चांगला खेळ दाखवू शकला होता. अन्वर आपल्या आयुष्यात आनंदी असताना अचानक २००१मध्ये त्याच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर तो पार कोलमडला. हा खेळाडू आपला खेळ कायम ठेवू शकला नाही. २००३ वर्ल्डकपनंतर तो रिटायर झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी