U19 WC:भारताविरुद्धच्या सामन्यात उतरला 'BABY AB', जबरदस्त शॉट खेळून केले सर्वांना हैराण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 17, 2022 | 12:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa, U19 World Cup:चार वेळा वर्ल्डकप विजेता असलेल्या भारतीय संघाने प्रत्येक विभागात शानदार कामगिरी करत द. आफ्रिकेला ४५ धावांनी हरवत अंडर १९ वर्ल्डकप  (U19 World Cup)ची विजयी सुरूवात केली. 

BABY AB
भारताविरुद्धच्या सामन्यात उतरला 'BABY AB', केली जबरदस्त खेळी 
थोडं पण कामाचं
  • भारत वि द. आफ्रिका क्रिकेट
  • अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेची दमदार सुरूवात
  • भारताने द. आफ्रिकेला हरवले

मुंबई: चार वेळा चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाने(team india) आपल्या अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेची(u19 world cup tournament) सुरूवात शानदार केली आहे. त्यांनी पहिल्याच सामन्यात द. आफ्रिकेला(south africa) ४५ धावांनी हरवत विजयी सुरूवात केली. प्रोविडेन्स स्टेडियममध्ये शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केल्या गेलेल्या भारताने यश धुलच्या ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर ४६.५ षटकांत २३२ धावा केल्या. त्यानंतर स्पिनर विक्की ओस्तवाल(२८ धावांत ५ विकेट) आणि वेगवान गोलंदाज राज बावा(४७ धावांत चार विकेट )अशी गोलंदाजीत कमाल दाखवत द. आफ्रिकेचा संघ ४५.४ ओव्हरमध्ये १८७ धावांवर गुंडाळला. BABY AB awesome play against india in u19 world cup 

BABY AB' नावाने प्रसिद्ध

भले या सामन्यात द. आफ्रिकेला जरी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी सामन्यादरम्यान, द. आफ्रिकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने जबरदस्त फलंदाजी केली आणि ९९ चेंडूवर ६५ धावा बनवत तो बाद झाला.. आपल्या डावात ब्रेविसने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ICC (@icc)

सामन्यादरम्यान त्याने भारतीय गोलंदाजांविरुद्ध असे काही शॉट लगावले की ते पाहून प्रत्येकाला एबी डे विलियर्सची आठवण आली. इतकंच नव्हे तर ब्रेविसने जेव्हा अर्धशतक ठोकले तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या त्याच्या साथीदारांनी उभे राहत त्याच्या या खेळीचा सन्मान केला. जेव्हा ब्रेविसने अर्धशतक ठोकले तेव्हा त्याच्या सहकारी खेळाडूंनी हा जल्लोष 'BABY AB' नावाचे पोस्टर हात घेत साजरा केला. सोशल मीडियावर द. आफ्रिकेचा युवा खेळाडूंडे हे जेस्चर खूप व्हायरल होत आहे. डेवाल्ड ब्रेविस आपल्या सहकाऱ्यांमध्ये 'BABY AB'नावाने प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे सामन्यादरम्यान त्याचे शॉट पाहून प्रत्येकाला वरिष्ठ एबी डे विलियर्सची आठवण आली. 

ब्रेविसची विकेट बावाने ३६व्या ओव्हरमध्ये भारताचा कर्णधार धुलच्या हाती कॅच देत घेतली. ब्रेविस बाद झाल्यानंतर द. आफ्रिकेचा डाव कोसळण्यास वेळ लागला नाही. कर्णधार जार्ज वान हीरडेनने ३६ धावा केल्या मात्र त्याला पराभवाचे धावांचे अंतर कमी करता आले नाही. 

भारताच्या युवा गोलंदाजीचा जलवा

भारताच्या अंडर १९ संघांने पहिल्यांदाफलंदाजी करताना २३२ धावा केल्या. यात कर्णधार यश धुलने १०० चेंडूंचा सामना करताना ८२ धावा केल्या. यात त्याने ११ चौकार लगावले. याशिवाय कौशल तांबेने ४४ चेंडूवर ३५ धावांची खेळी केली. दोघांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २३२ धावा करता आल्या. यानंतर द. आफ्रिकेच्या खेळीदरम्यान भारताचा गोलंदाज राज बावाने ४ तर विक्की ओस्तवालने ५ विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. विक्की ओस्तवालला प्लेयर ऑफ दी मॅचचा खिताब देण्यात आला. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी