Team india: टीम इंडियासाठी वाईट बातमी, वनडे मालिकेआधी हा महत्त्वाचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 12, 2022 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

washington sundar found corona positive: भारताचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे १९ जानेवारीपासून द. आफ्रिकेविरुद्द सुरू होत असलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत खेळणे संदिग्ध आहे. 

team india
टीम इंडियासाठी वाईट बातमी, वनडे मालिकेआधी या खेळाडूला कोरोना 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियासाठी वाईट बातमी
  • वनडे मालिकेआधी हा खेळाडू बाहेर
  • दीर्घकाळापासून टीम बाहेर आहे वॉशिंग्टन सुंदर

चेन्नई: द. आफ्रिकेविरुद्ध(india vs south africa) १९ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या वनडे मालिकेआधी(oneday series) टीम इंडियासाठी(team india) वाईट बातमी समोर आली आहे. भारताचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटिव्ह(washington sundar corona positive) आढळला आहे. त्यामुळे तो १९ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळेल की नाही शंका आहे. bad news for team india, washington sundar found corona positive

टीम इंडियासाठी वाईट बातमी

तामिळनाडूचा २२ वर्षीय खेळाडू बंगळुरूमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे तो मुंबईत मर्यादित षटकांच्या अन्य क्रिकेटर्ससोबत नाही. हे इतर खेळाडू एक ते दोन दिवसांत आफ्रिकेसाठी रवाना होत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की वॉशिंग्टन कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे तो मुंबईत वनडे खेळाडूंसोबतच नाही. तो बंगळुरूमध्ये (NCA)मध्ये पॉझिटिव्ह आढळला होता. 

वनडे मालिकेआधी महत्त्वाचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

वॉशिंग्टन वनडे मालिकेसाठी निवडलेल्या इतर खेळाडूंसोबत चार्टर्ड विमानात जाऊ शकणार नाही आणि आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही की बीसीसीआय त्याला वेगळे पाठवेल की नाही. द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका पार्लमध्ये १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. तर शेवटचा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. 

दीर्घकाळापासून बाहेर आहे सुंदर

दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर असलेला वॉशिंग्टनने डोमेस्टिक स्तरावर पुनरागमन केले होते. आणि आपल्या राज्याच्या संघासाटी त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली होती. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी