T20 WC : न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर ट्रेंड झाले BAN IPL, मेंटर धोनीवर केले गेले सवाल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 01, 2021 | 16:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 WC : टी20 वर्ल्ड कप 2021मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. दुबईत खेळवण्यात गेलेल्या सामन्यात केन विल्यमसन्सच्या न्यूझीलंड संघान विराट ब्रिगेडला आठ विकेटनी मात दिली. 

virat kohli
न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर ट्रेंड झाले BAN IPL 
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर आयपीएलला बंदी घालण्याची मागणी
  • मेंटर धोनीवरही काही लोकांनी केले सवाल
  • न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे क्रिकेट चाहते खूप नाराज आहेत.

दुबई: टी-२० वर्ल्डकप २०२१(t-20 world cup 2021)मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताला(india) पुन्हा पराभवाचे तोंड पाहावे लागले. दुबईत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात केन विल्यमसन्सच्या(kane willamsons) संघाने विराट ब्रिगेडला आठ विकेटनी पराभूत केले. सलगच्या दोन पराभवांमुळे भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या(new zealand) पराभवानंतर भारताचे क्रिकेट चाहते खूप नाराज आहेत. आता ट्विटरवर इंडियन प्रीमियर लीगवर(indian premier league) बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यासाठी  #BanIPL या हॅशटॅगचा वापर केला जात आहे.चाहत्यांचे म्हणणे आहे की जर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघ चांगली कामगिरी करत नसेल तर इतकी महागडी लीग भरवण्याची गरज काय.

याशिवाय चाहते मेंटर धोनीच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित करत आहेत. यासाठी हॅशटॅग MentorDhoni चा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट मंडळाने धोनीची मेंटर म्हणून नियुक्ती केली होती. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्डकपचा खिताब जिंकला होता.

या विजयासह न्यूझीलंड ग्रुप २मध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या ग्रुपमध्ये पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी तीन सामन्यात ६ गुण मिळवलेत. तर ३ पैकी २ सामन्यात विजय मिळवत अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. नामिबिया चौथ्या, भारत पाचव्या तर स्कॉटलंड शेवटच्या स्थानावर आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी