NZ vs BAN: न्यूझीलंडला हरवत बांगलादेशने केले अनेक रेकॉर्ड्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 05, 2022 | 13:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

बांगलादेशसाठी हा विजय मोठा आहे. परदेशी भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशचा हा सहावा विजय आहे आणि टॉप ५ रँकिंग टीमविरुद्ध पहिला विजय आहे. न्यूझीलंड सध्या कसोटी रँकिंगमध्ये दुसऱ्या तर बांगलादेश नवव्या स्थानावर आहे. 

bangladesh
NZ vs BAN: न्यूझीलंडला हरवत बांगलादेशने केले अनेक रेकॉर्ड्स 
थोडं पण कामाचं
  • बांगलादेशने न्यूझीलंडमध्ये दाखल केला एक विजय
  • ८ विकेटने हरवत बनवले रेकॉर्ड

मुंबई: बांगलादेशने(bangladesh) माऊंट माऊंगानुई के बे ओव्हल मैदानावर इतिहास रचत पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला(new zealand) ८ विकेटनी हरवत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत बांगलादेशने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध एकही कसोटी सामना(test match) जिंकला नव्हता. हा बांगलादेश संघाचा किवी संघाविरोधातील पहिला कसोटी विजय आहे. बांगलादेशच्या या विजयाचा हिरो ठरला वेगवान गोलंदाज इबादत हुसौन. इबादतने दुसऱ्या डावात ६ विकेट घेत न्यूझीलंडचा डाव केवळ १६९ धावांवर आटोपला. Bangladesh break records after beat new Zealand in test match

बांगलादेशचा हा मोठा विजय आहे. परदेशी भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशचा हा सहावा विजय आहे. तसेच टॉप ५ रँकिंग संघाविरुद्धचा पहिला विजय आहे. न्यूझीलंड सध्या कसोटी रँकिंगमध्ये दुसऱ्या तर बांगलादेश नवव्या स्थानावर आहे. या विजयासह त्यांनी आपल्या भूमीवर सलग १७ कसोटी सामन्यांत अपराजित राहण्याा न्यूझीलंडचा रेकॉर्ड बांगलादेशने तोडला आहे. याशिवाय क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडच्या मैदानावरील बांगलादेशचा हा पहिला विजय आहे. 

परदेशी भूमीवर बांगलादेशचा हा ६१वा कसोटी सामना होता. यापैकी बांगलादेशने केवळ ६ कसोटी सामने जिंकले आहेत. बांगलादेशने या विजयानंतर आपल्या कसोटी विजयाच्या लिस्टमध्ये आणखी एका देशाचे नाव सामील केले. याआधी बांगलादेशने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामने जिंकले आहेत. यानंतर बांगलादेशने एक उंच उडी घेत टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलवर पाचवे स्थान गाठले आहे. 

वेगवान गोलंदाज इबादत हुसैनने करिअरमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ४६ धावांत सहा विकेट मिळवल्या. यामुळे बांगलादेशने पहिल्या क्रिकेट कसोटीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडला आठ विकेटनी हरवले. माजी व्हॉलीबॉल खेळाडू इबादतने या सामन्यात आधी ८१च्या सरासरीने ११ विकेट घेतल्या. पहिल्या डावात त्याने ७५ धावा देत एक विकेट घेतला. त्यानंतर दुसऱ्या डावात इबादतने ६ विकेट घेत न्यूझीलंड संघाला उद्ध्वस्त केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी