World Cup सेमी फायनलवरून ट्रोल होतोय पाकिस्तान आणि ३१६ धावा, पाहा इंटरेस्टिंग ट्विट 

Pakistan cricket team trolled, World Cup 2019 semi final: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानसमोर अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्रीपासून यावरून खूप ट्रोल केल

pakistan crickt team situation
पाकिस्तान क्रिकेट टीमची परिस्थिती  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली :  आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९मध्ये बुधवारी खेळण्यात आलेल्या महामुकाबल्यात इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केले. इंग्लंडने मॅचमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना जॉनी बेरिस्टोच्या शानदार १०६ धावांच्या जोरावर न्यूझीलंड समोर ३०६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडचा संघ १८६ धावांमध्ये गारद झाला. यासोबत इंग्लंड गुणतालिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहचली. २७ वर्षांनंतर इंग्लंड टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाली आहे. यामुळे पाकिस्तान एका विचित्र परिस्थिती पोहचला आहे. 

आता गुणफलकावर न्यूझीलंड ११ अंकासह चौथ्या स्थानावर आहे. जर पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर बांग्लादेशला केवळ पराभूत करायचे नाही तर विक्रम अंतराने पराभूत करावे लागणार आहे. त्यांना बांग्लादेशला सुमारे ३१६ धावांनी पराभूत करावे लागणार आहे. त्यामुळे नेट रन रेटच्या बाबतीत ते न्यूझीलंडपेक्षा सरस होतीतल. पाकिस्तानच्या या विचित्र परिस्थितीवर क्रिकेट फॅन्सने पाकिस्तानच्या संघाला जबरदस्त ट्रोल केले आहे. चला पाहू या काही अनोखे ट्विट 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पाकिस्तानची स्थिती काही अशी आहे. बांग्लादेश विरूद्ध चारपैकी एक गोष्ट करावी लागणार आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ३०८ धावा केल्या तर त्यांना ३०८ धावांनी पराभूत करावे लागले. पाकिस्तानने ३५० धावा केल्या तर त्यांना ३१२ धावांनी पराभूत करावे लागले. पाकिस्तानने ४०० धावा केल्या तर बांग्लादेशला ३१६ धावांनी पराभूत करावे लागेल. पाकिस्तानने ४५० धावा केल्या तर बांग्लादेशला ३२१ धावांनी पराभूत करावे लागले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup सेमी फायनलवरून ट्रोल होतोय पाकिस्तान आणि ३१६ धावा, पाहा इंटरेस्टिंग ट्विट  Description: Pakistan cricket team trolled, World Cup 2019 semi final: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानसमोर अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्रीपासून यावरून खूप ट्रोल केल
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola