Asia Cup 2022: श्रीलंकेऐवजी या देशाला मिळू शकते आशिया कपचे यजमानपद

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 26, 2022 | 11:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

श्रीलंकेतील आर्थिक संकट पाहता आशियाई क्रिकेट काऊन्सिलने आशिया कपच्या यजमानपदासाठी दुसरे पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. भारत आणि पाकिस्तान आधीच या शर्यतीतून बाहेर आहेत. अशातच बांगलादेशला यजमानपद मिळू शकते. 

team india
श्रीलंकेऐवजी या देशाला मिळू शकते आशिया कपचे यजमानपद 
थोडं पण कामाचं
  • आशिया कपची सुरूवात २७ ऑगस्ट २०२२ला होणार असून ही स्पर्धा ११ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
  • भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आधीच यातून बाहेर आहेत.
  • . अशातच बांगलादेशकडे या स्पर्धेचे यजमानपद जाऊ शकते. 

मुंबई: आशिया कप २०२२चे( आयोजन या महिन्याच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणार आहे. मात्र आतापर्यंत ही स्पर्धा कोणत्या देशात खेळवली जाणार आहे याबाबत संभ्रम कायम आहे. आशियाई क्रिकेट कौन्सिलने आधी श्रीलंकेला याचे यजमानपद दिले होते. मात्र तेथे सुरू असलेला आर्थिक संकट आणि राजकीय अस्थिरता यां्यात दुसऱ्या देशाकडे याचे यजमानपद देण्याची चर्चा सुरू आहे. Bangladesh can host asia cup 2022 instead of srilanka

अधिक वाचा - फ्लिपकार्टवर इतक्या स्वस्त आहे मिनी फ्रिज

मीडिया रिपोर्टनुसार श्रीलंकेतील आर्थिक संकट पाहता आशियाई क्रिकेट कौन्सिल आशिया कपच्या यजमानपदासाठी दुसरा पर्याय शोधत आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आधीच यातून बाहेर आहेत. अशातच बांगलादेशकडे या स्पर्धेचे यजमानपद जाऊ शकते. 

आशिया कपची सुरूवात २७ ऑगस्ट २०२२ला होणार असून ही स्पर्धा ११ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. तर श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी आपल्या देशातील लोकांना सांगितले आहे की येणारे २ महिने हे त्यांच्यासाठी सगळ्यात कठीण असणार आहे. तेथे खाद्यपदार्थांची पूर्ती होत नाहीये आणि महागाईने उच्चांक गाठला आहे. 

भारत-पाकिस्तान घेऊ शकत नाहीत यजमानपद

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन मोठे संघ आहेत मात्र या दोन्ही देशादरम्यान दीर्घकाळापासून राजकीय तणाव सुरू आहे आणि नातेसंबंधही खराब आहेत. याच कारणामुळे हे दोन्ही देशाचे खेळाडू एकमेकांच्या देशात जाऊन खेळू शकत नाही. अशातच बांगलादेशशिवाय यूएई आणि ओमान हे दोन पर्याय यजमानपदासाठी आहेत. 

अधिक वाचा - कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई होणार

श्रीलंका पाकिस्तानात नाही खेळणार वनडे मालिका

पाकिस्तान आगामी काळात श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार होता मात्र दोन्ही देशादरम्यानची ही मालिका रद्द करण्यात आली. दरम्यान जुलै-ऑगस्टमध्ये होणारी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी