जगात कोणालाच जे जमलं नाही ते बांगलादेशच्या क्रिकेटरने करून दाखवलं...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 28, 2022 | 14:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

बांगलादेशी क्रिकेटर अनामुल हकने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. अनामुल जगातील असा पहिला क्रिकेटर बनला आहे जो लिस्ट ए स्पर्धेत १००० पेक्षा अधिक धावा करू शकला आहे. 

anamul haq
जगात कोणालाच जे जमलं नाही ते बांगलादेशच्या क्रिकेटरने केलं.. 
थोडं पण कामाचं
  • लिस्ट ए क्रिकेटमध्ये अनामुलच्या नावावर १५ शतकांचा रेकॉर्ड आहे.
  • अनामुलने एक हजारापेक्षा अधिक धावा करत लिस्ट ए स्पर्धेत एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
  • मुडीने १९९१मध्ये खेळण्यात आले्या संडे लीग स्पर्धेत एकूण ९१७ धावा केल्या होत्या. 

मुंबई: बांगलादेशी क्रिकेटर अनामुल हकने (Bangladesh cricketer Anamul haq) एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. अनामुल जगातील असा पहिला क्रिकेटर बनला आहे ज्याने लिस्ट ए स्पर्धेत(list a tournament) एक हजारापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अनामुल हकने ही कामगिरी ढाका प्रीमियर लीगमध्ये(Dhaka Premier Division Cricket LeagueL)  केली. या स्पर्धेत अनामुलने ३ शतकेही ठोकली आहेत. Bangladesh cricketer Anamul haq became the first batsman to score 1000+ runs in a List A tournament

अधिक वाचा - 9 बायकांच्या प्रेमासाठी बनवलं टाइम टेबल, पण...

सोबतच लिस्ट ए क्रिकेटमध्ये अनामुलच्या नावावर १५ शतकांचा रेकॉर्ड आहे. अनामुलने एक हजारापेक्षा अधिक धावा करत लिस्ट ए स्पर्धेत एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तर त्याने टॉम मुडीचा रेकॉर्ड मोडीत काढला. मुडीने १९९१मध्ये खेळण्यात आले्या संडे लीग स्पर्धेत एकूण ९१७ धावा केल्या होत्या. 

लिस्ट ए लीग स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

1042 - ढाका प्रीमियर लीगमध्ये अनामुल हक, 2022
917 - टॉम मुडी, संडे लीग, 1991 मध्ये
902 - जिमी कूक, संडे लीगमध्ये, 1990
861 -  जॅक्स रूडॉल्फ,  Pro40, 2010

अनामुल हकच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास या क्रिकेटरने आतापर्यंतच्या ४ कसोटी सामने खेळले आहेत. तर ३८ वनडे सामने खेळले आहेत. तर १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडेत त्याने ३ शतके ठोकली आहेत. 

अधिक वाचा - खुशखबर! प्रत्येक आठवड्याला मिळणार ३ दिवस सुट्टी

अनामुल हक बिजॉयने स्पर्धेच्या गेल्या सामन्यात लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. २४ एप्रिलला खेळवण्यात आलेल्या सामन्यात शेख जमाल धनमंडी क्लबविरुद्ध त्याने ५२ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने आता हजारापेक्षा अधिक धावा करत टॉम मूडी यांचा रेकॉर्ड मोडलाय. मूडी यांनी १९९२मध्ये इंग्लंडच्या संडे लीगमध्ये वॉर्सेस्टरशायरसाठी खेळताना १५ डावांत ९१७ धावा केल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी