BAN vs NZ : ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशी खेळाडूंचे अनोखे सेलिब्रेशन; पाहा व्हिडीओ 

BAN vs NZ बांगलादेशच्या संघाने अशी काही कामगिरी केली आहे, जी कामगिरी हल्ली कोणत्याच बलाढ्य संघाला करता आली नाही. बांगलादेशच्या संघाने यजमान न्यूझीलंडला त्याच्यांच देशात कसोटी सामन्यांत पराभूत केले आहे.

bangladesh team
बांगलादेशने  
थोडं पण कामाचं
  • बांगलादेशने यजमान न्यूझीलंडला त्याच्यांच देशात कसोटी सामन्यांत पराभूत केले आहे.
  • बांगलादेने हि किमया संघाचा स्टार शाकिब अल हसनच्या गैरहजेरीत साधली आहे.
  • बांगलादेशने ८ गडी राखून मिळवला विजय 

Bangladesh Team celebrations  : माउंट मौनगानुई : बांगलादेशच्या संघाने (Bangladesh Team) अशी काही कामगिरी केली आहे, जी कामगिरी हल्ली कोणत्याच बलाढ्य संघाला करता आली नाही. बांगलादेशच्या संघाने यजमान न्यूझीलंडला (New Zealand) त्याच्यांच देशात कसोटी सामन्यांत पराभूत केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे बांगलादेशी संघाने हि किमया संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या (Shakib Al Hasan) गैरहजेरीत साधली आहे. (Bangladesh Team dressing room celebrations after historic win at Mount Maunganui ) 

बांगलादेशने माउंट मौनगानुई येथे गतविजेत्या न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव करून न्यूझींलंडच्या धरतीवर क्रिकेटच्या तिन्ही  फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) आपला पहिला विजय मिळवला आणि सोबतच एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशी संघाने विजयाचे सेलिब्रेशन देखील अनोख्या पध्दतीने केले. बांगलादेशी संघाने यजमान संघाला पहिल्याच कसोटी सामन्यात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला. त्याचाच एक व्हिडीओ बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) शेयर केला आहे. 

दरम्यान, या व्हिडीओमध्ये सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफ एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेले पाहायला मिळत आहेत. यादरम्यान संघाचा ३४ वर्षीय अनुभवी खेळाडू मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim) मार्गदर्शन केल्यानंतर सर्व खेळाडू एकत्र उडी मारताना दिसत आहेत. व्हिडीओत रहिमने बोललेले हे देखील ऐकायला मिळू शकते की आपण ऐतिहासिक विजय मिळवला आहे, तर त्याचा पूर्ण आनंदही लुटला पाहिजे. यानंतर सर्व खेळाडू आनंदाने उड्या मारतात. 

बांगलादेशने ८ गडी राखून मिळवला विजय 

बांगलादेश क्रिकेट संघाच्या (Bangladesh Cricket Team) कसोटीमधील या सर्वात मोठ्या विजयाचा हिरो इबादत हुसैन (Ebadot Hossain) ठरला. त्याने सामन्याच्या चौथ्याच दिवशी संघाची ऐतिहासिक विजयाकडे कूच केली होती. इबादतने सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी न्यूझीलंडचे शेवटचे दोन गडी बाद केले. दुसऱ्या डावात यजमान संघ केवळ १६९ धावांवर माघारी परतला, ही त्यांची बांगलादेशविरुद्धची सर्वात कमी धावसंख्या आहे. पहिल्या डावात यजमान न्यूझीलंडचा संघ १३० धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी केवळ ४० धावांची आवश्यकता होती, ज्याला बांगलादेशच्या संघाने ८ गडी राखून पूर्ण केले. 

बांगलादेशचा विदेशी धरतीवर कसोटीतील सहावा विजय 

विदेशी धरतीवर बांगलादेशच्या संघाचा कसोटीमधील हा सहावा विजय आहे आणि क्रमवारीतील पहिल्या पाच क्रमाकांच्या संघांपैकी कोणत्याही संघाविरूध्दचा हा पहिला विजय ठरला आहे. सध्याच्या घडीला न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत (Test Ranking) दुसऱ्या आणि बांगलादेश नवव्या स्थानावर आहे. या विजयासोबतच बांगालदेशने न्यूझीलंडचा आपल्या धरतीवर सलग १७ कसोटी सामन्यांमध्ये विजयी होण्याचा विक्रमही मोडीत काढला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी