आज भारत-बांगलादेश पहिली वन डे, जाणून घ्या दोन्ही देशांची Dream11 Team

Bangladesh vs India 1st ODI at Dhaka, Predictions about Bangladesh and India Dream11 Team : भारत आणि बांगलादेश यांच्यात बांगलादेशमध्ये रविवार 4 डिसेंबर 2022 पासून 3 वन डे मॅचची सीरिज सुरू होत आहे.

Bangladesh vs India 1st ODI
आज भारत-बांगलादेश पहिली वन डे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आज भारत-बांगलादेश पहिली वन डे
  • 3 वन डे मॅचची सीरिज सुरू होणार
  • जाणून घ्या दोन्ही देशांची Dream11 Team

Bangladesh vs India 1st ODI at Dhaka, Predictions about Bangladesh and India Dream11 Team : भारत आणि बांगलादेश यांच्यात बांगलादेशमध्ये रविवार 4 डिसेंबर 2022 पासून 3 वन डे मॅचची सीरिज सुरू होत आहे. यानंतर 2 टेस्ट मॅचची सीरिज पण होणार आहे. या 5 मॅच बांगलादेशमध्ये होतील. बांगलादेशची राजधानी ढाका येथे 2 वन डे आणि 1 टेस्ट होणार आहे. चटोग्राम येथे 1 वन डे आणि 1 टेस्ट होणार आहे. या 5 मॅच सोनी लिव्ह (Sony LIV) या अॅपवर बघता येतील. टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर मॅचचे थेट प्रक्षेपण होईल. 

आज म्हणजेच रविवार 4 डिसेंबर 2022 रोजी ढाका येथील शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमववर भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली वन डे मॅच होणार आहे. सकाळी 11.30 पासून सोनी लिव्ह (Sony LIV) या अॅपवर आणि टीव्हीवरती सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर मॅचचे थेट प्रक्षेपण होईल. 

न्यूझीलंड विरुद्धच्या वन डे सीरिजमध्ये भारताचा 1-0 असा पराभव झाला. याआधी भारताने वेगवेगळ्या देशांसोबतच्या सलग 5 वन डे सीरिज जिंकल्या होत्या. पण न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारताची विजयाची मालिका खंडीत झाली. आता बांगलादेश विरुद्धच्या सीरिजच्या निमित्ताने भारत पुन्हा एकदा वन डे सीरिज विजयाची नवी मालिका सुरू करणार का याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

बांगलादेश दौऱ्यावर जात असलेल्या टीममध्ये कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल पुन्हा खेळताना दिसतील. या 3 खेळाडूंना आराम देण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यातून वगळण्यात आले होते. मोहम्मद शमी हा वेगवान गोलंदाज खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यावर गेलेला नाही.

मोहम्मद सिराज, दीपक चहर, शार्दुल ठाकुर आणि कुलदीप सेन या 4 वेगवान गोलंदाजांच्या उपस्थितीमुळे शमीची रिप्लेसमेंट म्हणून पाचवा वेगवान गोलंदाज भारतातून बांगलादेशला पाठवला जाण्याची शक्यता कमी आहे. 

वन डे सीरिजसाठी टीम इंडिया (ODI Team India) : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हाइस कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), शाहबाझ अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन

ड्रीम11 टीम इंडिया (India Dream11 Team) : रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल (व्हाइस कॅप्टन), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, मोहम्मद सिराज

वन डे सीरिजसाठी बांगलादेशची टीम (ODI Team Bangladesh) : अनामुल हक, लिटन दास (कॅप्टन), शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ हुसैन, महमूदुल्लाह, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, एबादत हुसैन, यासिर अली, नजमुल हुसैन शान्तो, तस्कीन अहमद, नासुम अहमद

ड्रीम11 टीम बांगलादेश (Bangladesh Dream11 Team) : नजमुल हुसैन शान्तो, लिटन दास (कॅप्टन), अनामुल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमूदुल्लाह, अफीफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, एबादत हुसैन, मुस्तफिजुर रहमान

खेळपट्टी : खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल. यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमला मोठी धावसंख्या उभारून तगडे आव्हान देण्याची संधी आहे. 

हवामान : आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान 30 अंश से. राहण्याची शक्यता.

Ruturaj Gaikwad: या क्रिकेरटरमुळे ऋतुराजने 1 ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्स...खोलले गुपित

भारताविरुद्धच्या वन डे सीरिजआधी बांगलादेशला मोठा धक्का

भारताचा बांगलादेश दौरा

ढाक्यातील सर्व मॅच शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमवर तर चटोग्राममधील सर्व मॅच जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणार

  1. रविवार 4 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश पहिली वन डे, ढाका. थेट प्रक्षेपण सकाळी 11.30 पासून
  2. बुधवार 7 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश दुसरी वन डे, ढाका. थेट प्रक्षेपण सकाळी 11.30 पासून
  3. शनिवार 10 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश तिसरी वन डे, चटोग्राम. थेट प्रक्षेपण सकाळी 11.30 पासून
  4. बुधवार 14 डिसेंबर 2022 ते रविवार 18 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश पहिली टेस्ट, चटोग्राम. थेट प्रक्षेपण सकाळी 9 पासून
  5. गुरुवार 22 डिसेंबर 2022 ते सोमवार 26 डिसेंबर 2022, भारत वि. बांगलादेश दुसरी टेस्ट, ढाका. थेट प्रक्षेपण सकाळी 9 पासून

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी