बीसीसीआयला शेतकऱ्यांच्या विरोधाची भीती, मोहालीमधून आयपीएलचे सामने हटवले: रिपोर्ट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Mar 03, 2021 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

BCCI: बीसीसीआयने आयपीएल 2021साठी मोहालीमध्ये सामने न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे लोक चकित झाले आहेत. आता समोर येत आहे की शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

Mohai cricket stadium
बीसीसीआयला शेतकऱ्यांच्या विरोधाची भीती, मोहाली आयपीएलच्या ठिकाणांवरून या कारणामुळे हटवले: रिपोर्ट 

थोडं पण कामाचं

  • तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमांवर चालू आहे आंदोलन
  • पंजाबमधून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होण्याची शक्यता
  • बीसीसीआयने शेतकरी विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोहाली यादीतून हटवले

नवी दिल्‍ली: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) (आयपीएल) 2021च्या मालिकेसाठी (series) ठिकाणांची (venues) निवड जवळपास निश्चित झाली आहे. यावर्षी कोव्हिड-19च्या (Covid-19) वाढत्या संसर्गामुळे सामने मुंबईत (Mumbai) होणे अशक्य आहे तर नव्या कृषी कायद्यांविरोधात (farm laws) चालू असलेल्या आंदोलनामुळे (protests) पंजाबचे (Punjab) नावही घेण्यात आलेले नाही. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमांवर (Delhi borders) शेतकरी आंदोलन (famers movement) चालू आहे, पण अद्याप यावर तोडगा (solution) निघालेला नाही.

पंजाबमध्ये सामने झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय व्यासपीठ

भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाला भीती आहे की जर आयपीएलचे सामने पंजाबमध्ये झाल्यास शेतकऱ्यांना जागतिक माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याची संधी मिळेल. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार शेतकरी आंदोलन या एकमेव कारणामुळे बीसीसीआयने मोहालीत सामने न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये आगामी निवडणुका असल्याने बीसीसीआयने वेगळ्या जागा निवडल्या आहेत.

बीसीसीआयच्या निर्णयामुळे नाखुश आहे पंजाब

पंजाब किंग्सचे सीईओ सतीश मेनन यांनी मान्य केले आहे की बीसीसीआयच्या मोहालीत सामने न घेण्याच्या निर्णयामुळे ते नाराज आहेत. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विटरवर बीसीसीआयला यावर पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे, 'आगामी आयपीएल मालिकेतून मोहाली क्रिकेट स्टेडियम काढून टाकण्याच्या निर्णयामुळे मी चकित झालो आहे. मी बीसीसीआय आणि आयपीएलला अपील करतो की यावर पुनर्विचार करावा. मोहालीने आयपीएलचे यजमानपद भूषवू नये याचे कोणतेही कारण नाही आणि सरकार कोव्हिड-19च्या सुरक्षानियमांचे पूर्ण पालन करेल.'

पंजाब किंग्सच्या सहमालकांनी बीसीसीआयला लिहिले पत्र

पंजाब किंग्सचे सहमालक नेस वाडिया यांनी खुलासा केला आहे की संघाने बीसीसीआयला पत्र लिहून मोहालीवर पुन्हा निर्णय घेण्याची विनंती केली आहे. वाडिया यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले आहे, 'आम्ही बीसीसीआयला लिहिले आहे की कोणत्या निकषांवर आपण या ठिकाणांची निवड केली आहे आणि यात मोहालीची निवड का होऊ नये हे आम्हाला सांगावे. पंजाबमध्ये आयपीएलचे सामने होतील अशी आम्हाला आशा आहे.' सध्या बीसीसीआय अद्यापही 2021च्या सीझनवर काम करत आहे. सर्वात मोठी चिंता ही ठिकाणांची आहे जिथे सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी