India women's squad for 2022 World Cup: भारतीय क्रिकेट बोर्डाने(bcci) न्यूझीलंडमध्ये(new zealand) खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२२साठी(icc womens cricket world cup 2022) १५ सदस्यीय संघाची घोषणा(team announce) केलेली आहे. बीसीसीआयने सोबत हेही सांगितले की भारताचा हा संघ न्यूझीलंडविरुद्ध पा सामन्यांच्या वनडे मालिकेसाठीही उतरणार आहे. टीम इंडियाची कमान अनुभवी फलंदाज मिताली राज(mithali raj) सांभाळणार आहे. तर धाकड खेळाडू हरमनप्रीत कौरकडे उपकर्णधारपद येणार आहे. टीममध्ये अनेक ओळखीच्या अनोखळीच्या चेहऱ्यांना स्थान मिळालेले नाही. यातील एक नाव म्हणजे जेमिमा रोड्रिगेज. शिखा पांडेलाही संघात सामील करण्यात आलेले नाही. bcci announce team india for icc womens oneday world cup 2022
वर्ल्डकपची सुरूवात ४ मार्चपासून होत आहे. स्पर्धेचा उद्घाटन सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जाणार आहे. तर भारतीय संघ ६ मार्चपासून आपल्या अभियानाला सुरूवात करत आह. भारत ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. त्यानंतर १२ मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध, १६ मार्चला इंग्लंडविरुद्ध, १९ मार्चला ऑस्ट्रेलियाविरुद्ध, २२ मार्चला बांगलादेशविरुद्ध आणि २७ मार्चला द. आफ्रिकेविरुद्ध सामना रंगत आहे.
भारतीय संघात जेमिमा रॉड्रिग्स, शिखा पांडे, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती आणि हरलीन देओल यांना स्थान देण्यात आलेले नाही. यापैकी जेमिमाला संघात स्थान न दिल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुंबईची जेमिमा सध्या चांगल्या फॉर्मात आहे. तिने इंग्लंडमधील
द हंड्रेड तसेच ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती.
स्पर्धा ३१ दिवस सुरू राहणार आहे. यात ३१ सामने खेळवले जातील. तसेच आठ संघ प्रतिष्ठेचा मानला जाणारा वर्ल्डकप जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतील. फायनल सामना ४ एप्रिलला खेळवला जाईल. सेमीफायनल आणि फायनल सामन्यांसाठी एक सुरक्षित दिवस ठेवण्यात आला आहे. संघाचे यजमान सहा शहरे ऑकलंड, ख्राईस्टचर्च, डुनेडिन, हॅमिल्टन, टोरंगा आणि वेलिंग्टनमध्ये केले जाणार.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारताने आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०१७-२० दरम्यान आपल्या चांगल्या कामगिरीच्या आधारावर वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय केले आहे. तर न्यूझीलंड या स्पर्धेचे यजमानपद सांभाळत असल्याने त्यांनी जागा बनवली आहे. कोरोनामुळे अनिश्चितता असल्यामुळे महिला वर्ल्डकप क्वालिफायर रद्द केल्या जाण्यामुळे बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांनी टीम रँकिंगच्या आधारावर अंतिम तीन स्थाने मिळवली आहेत.
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका ठाकुर, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वरी गायकवाड़, पूनम यादव.
स्टँडबाय खेळाडू : सब्बीनेनी मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादुर.