मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये(indian cricket) अखेर तो बदल झालाच ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. विराट कोहलीने(virat kohli) टी-२० वर्ल्डकप २०२१आधी भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद(t-20 captain) सोडले होते. मात्र आता त्याच्याकडून वनडेचे कर्णधारपदही(one day captainship) हिरावून घेतले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी(south africa tour) जेव्हा बुधवारी बीसीसीआयने(bcci) निवड समितीने(selection committee) कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली तेव्हा सर्वांना वनडे संघाचीही प्रतीक्षा होती. निवड समितीने वनडे संघाची घोषणा केली नाही मात्र इतकं जरूर सांगितलं की रोहित शर्मा(rohit sharma) आता वनडे संघाचा कर्णधार असणार आहे तसेच तो कसोटीतही उप कर्णधार असेल. bcci announce test team of india for south africa tour
विराट कोहलीला बुधवारी भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि राष्ट्रीय निवड समितीने २०२३ वनडे वर्ल्डकपपर्यंत रोहित शर्माला नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. तसेच अजिंक्य रहाणेला कसोटी उप कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी रोहितची निवड करण्यात आली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माला पूर्णपणे जबाबदारी देण्याची चर्चा सुरू आहे. जेव्हा नवा कोच राहुल द्रविड यांची एंट्री झाली तेव्हा ही मागणी अधिक वाढली. रोहित शर्मा आता वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार आहे.
बीसीसीआयने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १८ सदस्यी संघाची घोषणा केली आहे. यात रवींद्र जडेजा, स्पिनर अक्षर पटेल आणि सलामीवीर शुभमन गिल यांना फिटनेसमुळे संघात स्थान देण्यात आलेले नाही. हनुमा विहारीला संघात घेतले आहे. तर खराब फॉर्म असतानाही वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि चेतेश्वर पुजाराला संघात स्थान दिले आहे. भारतीय वनडे संघाची घोषणा नंतर केली जाणार आहे. कारण ही मालिका १५ जानेवारीपासून सुरू होतेय.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रिधिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शारदुल ठाकुर, मोहम्मद सिराज.
स्टँडबाय : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर आणि अर्जन नागवासवाला.