कोहली, शर्मा, बुमराह बीसीसीआयचे ए प्लस खेळाडू

बीसीसीआयने ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी भारताच्या पुरुष क्रिकेट संघातून खेळणाऱ्या खेळाडूंचा करार जाहीर केला.

BCCI announces annual player retainership 2020-21 for Team India
कोहली, शर्मा, बुमराह बीसीसीआयचे ए प्लस खेळाडू 

थोडं पण कामाचं

  • कोहली, शर्मा, बुमराह बीसीसीआयचे ए प्लस खेळाडू
  • ए आणि सी श्रेणीत प्रत्येकी दहा तर बी श्रेणीत पाच खेळाडू
  • ए प्लस श्रेणीच्या खेळाडूंना ७ कोटी तर ए श्रेणीच्या खेळाडूंना ५ कोटी रुपये मिळणार

मुंबईः बीसीसीआयने ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी भारताच्या पुरुष क्रिकेट संघातून खेळणाऱ्या खेळाडूंचा करार जाहीर केला. या करारानुसार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रित बुमराह या तीन खेळाडूंना बीसीसीआयने ए प्लस श्रेणीत ठेवले आहे. या खेळाडूंना करारातील सर्व अटींचे पालन केल्यास वर्षभरात सात कोटी रुपये दिले जाणार आहेत. BCCI announces annual player retainership 2020-21 for Team India (Senior Men)

रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन लोकेश राहुल (के. एल. राहुल), मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषक्ष पंत आणि हार्दिक पंड्या या दहा खेळाडूंना बीसीसीआयने ए श्रेणीत ठेवले आहे. या खेळाडूंना करारातील सर्व अटींचे पालन केल्यास वर्षभरात पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत. 

वृद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि मयंक अग्रवाल या पाच खेळाडूंना बीसीसीआयने बी श्रेणीत ठेवले आहे. या खेळाडूंना करारातील सर्व अटींचे पालन केल्यास वर्षभरात तीन कोटी रुपये दिले जाणार आहेत.

कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज या दहा खेळाडूंना बीसीसीआयने सी श्रेणीत ठेवले आहे. या खेळाडूंना करारातील सर्व अटींचे पालन केल्यास वर्षभरात दोन कोटी रुपये दिले जाणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून खेळाडूंसोबतच्या कराराची माहिती जाहीर केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी