BCCI Annual Player Retainership : बीसीसीआयच्या नव्या करारानुसार हे 4 खेळाडू ए प्लस कॅटेगरीत राहणार

BCCI announces annual player retainership 2022-23 For Team India Senior Men : बीसीसीआयने भारताच्या पुरुष क्रिकेट टीमच्या खेळाडूंसाठी 2022-23 या सीझनसाठी नवे करारपत्र जाहीर केले आहे.

BCCI Annual Player Retainership
BCCIच्या नव्या करारानुसार हे 4 खेळाडू ए प्लस कॅटेगरीत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआयने भारताच्या पुरुष क्रिकेट टीमच्या खेळाडूंसाठी 2022-23 या सीझनसाठी नवे करारपत्र जाहीर केले
  • टीम इंडियाचे 4 खेळाडू ए प्लस श्रेणीत, 5 खेळाडू ए श्रेणीत
  • टीम इंडियाचे 6 खेळाडू बी श्रेणीत आणि 11 खेळाडू सी श्रेणीत

BCCI announces annual player retainership 2022-23 For Team India Senior Men : बीसीसीआयने भारताच्या पुरुष क्रिकेट टीमच्या खेळाडूंसाठी 2022-23 या सीझनसाठी नवे करारपत्र जाहीर केले आहे. यानुसार टीम इंडियाचे 4 खेळाडू ए प्लस श्रेणीत, 5 खेळाडू ए श्रेणीत, 6 खेळाडू बी श्रेणीत आणि 11 खेळाडू सी श्रेणीत आहेत. करारपत्राची माहिती बीसीसीआयच्यावतीने मानद सचिव (ऑनररी सेक्रेटरी) जय शहा यांनी प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली.

ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना वर्षभरासाठी प्रत्येकी 7 कोटी रुपये  मिळतील. ए श्रेणीतील खेळाडूंना वर्षभरासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळतील. बी श्रेणीतील खेळाडूंना वर्षभरासाठी प्रत्येकी 3 कोटी रुपये मिळतील. सी श्रेणीतील खेळाडूंना वर्षभरासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळतील. कराराच्या अटीशर्ती आणि नियम खेळाडूंसाठी बंधनकारक असतील. 

बीसीसीआयच्या ए प्लस श्रेणीत 2022-23 या सीझनसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या 4 खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयच्या ए श्रेणीत 2022-23 या सीझनसाठी हार्दिक पांड्या, आर. अश्विन, मोहम्मद शमी, रिषभ पंत, अक्षर पटेल या 5 खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयच्या बी श्रेणीत 2022-23 या सीझनसाठी चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल या 6 खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयच्या सी श्रेणीत 2022-23 या सीझनसाठी उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, दीपक हुड्डा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत या 11 खेळाडूंचा समावेश आहे.

IPL 2023 मध्ये नाही खेळणार हे खेळाडू

IPL मधून चमकलेले भारतीय क्रिकेटपटू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी