वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर

BCCI announces revised venues for home series against West Indies : कोरोना संसर्गाचा धोका कमी व्हावा तसेच १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी असलेला आयपीएल लिलाव या दोन कारणांमुळे वेस्ट इंडिजच्या पुरुष क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

BCCI announces revised venues for home series against West Indies
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर 
थोडं पण कामाचं
  • वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर
  • कोरोना संसर्गाचा धोका कमी करणे आणि IPL लिलाव यामुळे वेळापत्रकात बदल
  • बीसीसीआयने नवे वेळापत्रक जाहीर केले

BCCI announces revised venues for home series against West Indies : मुंबई : कोरोना संसर्गाचा धोका कमी व्हावा तसेच १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी असलेला आयपीएल लिलाव या दोन कारणांमुळे वेस्ट इंडिजच्या पुरुष क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नवे वेळापत्रक वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांनी परस्पर सहमतीने निश्चित केले आहे. बीसीसीआयने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

नव्या वेळापत्रकानुसार वेस्ट इंडिज भारतात गुजरातच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये ६, ९ आणि ११ फेब्रुवारी रोजी वन डे मॅच खेळणार आहे. यानंतर १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर टी २० मॅच खेळणार आहे. 

याआधी वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील वन डे मॅच ६, ९ आणि १२ फेब्रुवारी रोजी होणार होत्या. पण १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा लिलाव असल्यामुळे वन डे मॅचच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील टी २० मॅच १५, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी होणार होत्या. आता १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी टी २० मॅच होणार आहेत. 

नव्या वेळापत्रकामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचेल. क्रिकेट मॅचच्या निमित्ताने प्रसारण करणारी यंत्रणा, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा अनेकांचा मोठा प्रवास होतो. सध्याचे कोरोना संकट पाहता वारंवार प्रवास केल्यास संसर्ग पसरण्याचा धोका वाढू शकतो. हा धोका कमी करण्यासाठी मॅचच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. सर्व वन डे मॅच गुजरातच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये तर सर्व टी २० मॅच कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर खेळविण्याचा निर्णय झाला आहे. 

नवे वेळापत्रक - वेस्ट इंडिज वि. भारत

  1. पहिली वन डे - ६ फेब्रुवारी २०२२ - नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम
  2. दुसरी वन डे - ९ फेब्रुवारी २०२२ - नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम
  3. तिसरी वन डे - ११ फेब्रुवारी २०२२ - नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम
  4. पहिली टी २० - १६ फेब्रुवारी २०२२ - इडन गार्डन, कोलकाता
  5. दुसरी टी २० - १८ फेब्रुवारी २०२२ - इडन गार्डन, कोलकाता
  6. तिसरी टी २० - २० फेब्रुवारी २०२२ - इडन गार्डन, कोलकाता

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी