मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) तीन सामन्यांच्या T20मालिका आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर निवड समितीने (Selection Committee) काही कठोर निर्णय घेतले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील काही खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. तर शिवम मावी, मुकेश कुमार आणि राहुल त्रिपाठी या युवा खेळाडूंना टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. ( BCCI announces Team India for Sri Lanka series, Suryakumar-Hardik has big responsibility)
अधिक वाचा : CRPF मध्ये 1458 हेड कॉन्स्टेबल आणि ASIभरती
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात निवड समितीचा हा शेवटचा निर्णय आहे. टी-20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर निवड समितीला बरखास्त करण्यात आलं होतं, पण अजूनही नव्या निवड समितीची घोषणा झालेली नाही, त्यामुळे या सीरिजसाठी जुन्या निवड समितीनेच टीमची घोषणा केली आहे. या संघ निवडीत मोठे बदल झालेले दिसत आहेत. टी-20 सीरिजमध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांना स्थान देण्यात आलेलं नाही. तर ऋषभ पंतला टी-20 तसंच वनडे टीममधूनही बाहेर ठेवण्यात आले आहे.
अधिक वाचा : रत्नागिरी जिल्हयात एक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह
ऋषभ पंत टी-20 फॉरमॅटमध्ये वारंवार फ्लॉप होत आहे, त्यामुळे त्याला डच्चू देण्यात आला असून त्याच्याऐवजी संजू सॅमसनला संधी मिळाली आहे.याचबरोबर केएल राहुलला उपकर्णधारपदही गमवावे लागले आहे. भारताच्या टी-20 टीमचे कर्णधारपद हार्दिक पांड्याला देण्यात आले आहे, तर सूर्यकुमार यादव उपकर्णधार आहे. मात्र एकदिवशीय सामन्यांसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येईल तर हार्दिक पांड्याला वनडे टीमचं उपकर्णधार करण्यात आले आहे.
दुखापतीमुळे रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धची टेस्ट सीरिज खेळू शकला नव्हता, त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धची टी-20 सीरिज खेळेल का नाही, याबाबत साशंकता होती. आज सकाळीच रोहित शर्मा मुंबईत नेट प्रॅक्टिस करताना दिसल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला. याचबरोबर टी-20 टीममध्ये कुलदीप यादवचं बऱ्याच काळानंतर पुनरागमन झालं आहे. बांगलादेश दौऱ्यात वनडे सामन्यात द्विशतक करणाऱ्या इशान किशनला दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. वनडे टीममधून शिखर धवनला बाहेर करण्यात आलं आहे.
अधिक वाचा : 'पठाण' अडकणार वादाच्या भोवऱ्यात?
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग
भारत विरुद्ध श्रीलंका पहला टी20 सामना: 3 जानेवारी- वानखेड़े स्टेडियम, मुंबई.
भारत विरुद्ध श्रीलंका दूसरा टी20 सामना: 5 जानेवारी- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे.
भारत विरुद्ध श्रीलंका तीसरा टी20 सामना: 7 जानेवारी- सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट.
भारत विरुद्ध श्रीलंका पहिली वनडे: 10 जानेवारी- बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी.
भारत विरुद्ध श्रीलंका दूसरी वनडे: 12 जानेवारी- ईडन गार्डन्स, कोलकाता.
भारत विरुद्ध श्रीलंका तीसरी वनडे: 15 जानेवारी- ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम.