मुंबई: आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने(bcci) टीम इंडियाची(team india) घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्यावर(hardik pandya) सोपवण्यात आले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्सने खिताब जिंकला होता. हार्दिक पांड्यासह बीसीसीआयने गेल्या एका वर्षात हा सहावा कर्णधार भारतीय टी-२० संघासाठी(t-20 team) निवडला आहे. बीसीसीआयच्या सातत्याने कर्णधार बदलण्याचा निर्णय टी-२० वर्ल्डकपमध्ये भारी पडू नये. BCCI changes 6 captain of team india in last 12 months
अधिक वाचा - चहा कपातीमुळे सुधारेल पाकची अर्थव्यवस्था -पाकिस्तानचे मंत्री
गेल्या वर्षी बीसीसीआयने शिखर धवनला कर्णधार बनवण्यात आले होते. तेव्हा वरिष्ठ संघ इंग्ल्ड दौऱ्यावर आला होता आणि श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाचे नेतृत्व शिखर धवनने सांभाळले होते. या दौऱ्यावर भारतीय संघाला टी-२० मालिकेत २-१ असे पराभवास सामोरे जावे लागले होते. कर्णधार बनल्यानंतर शिखर धवनचे करिअर धोक्यात आले आणि तो टीम इंडियातून बाहेर झाला.
सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया टी-२० वर्ल्डकप २०२१ ही स्पर्धा खेळली. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. संघ सेमीफायनलपर्यंतही पोहोचू शकला नाही. याच कारणामुळे टी-२० वर्ल्डकपनंतर भारताच्या खराब कामगिरीमुळे विराटकडून नेतृत्व काढून घेण्यात आले.
विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्माला नवा कर्णधार बनवण्यात आला. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. संघाने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध क्लीन स्वीप केले. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकही टी-२० सामना गमावला नाही.
रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने आफ्रिका दौऱ्यावर केएल राहुलला कर्णधार बनवण्यात आले. राहुलच्या नेतृत्वात टीम इंडियाा आफ्रिकेविरुद्ध सलग तीन टी-२० सामन्यांत पराभव सहन करावा लागला. मात्र राहुलने फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली.
अधिक वाचा - सोन्याच्या भावात वाढ, मात्र अजूनही उच्चांकीपेक्षा स्वस्त
जेव्हा आफ्रिकेचा संघ पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यास भारतात आला तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुल झाला. मात्र ऐनवेळेस दुखापतीमुळे राहुल बाहेर झाला. त्यामुळे भारताचे नेतृत्व ऋषभ पंतला देण्यात आले. पंतच्या नेतृत्वात भारत ५ सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. त्यानंतर आता आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे.