Doping in Indian Cricket : भारतीय क्रिकेटपटू क्षमता वाढवण्यासाठी इंजेक्शन घेतात, चेतन शर्माने स्टिंगमध्ये केला धक्कादायक गौप्यस्फोट

BCCI chief selector Chetan Sharma talk about doping in Indian Cricket : झी मीडियाने भारतीय क्रिकेट टीमच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा केला आहे. चेतन शर्मा स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडपणे धक्कादायक गौप्यस्फोट करत असल्याचाही दावा झी मीडियाने केला आहे.

Doping in Indian Cricket
चेतन शर्माने स्टिंगमध्ये केला धक्कादायक गौप्यस्फोट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतीय क्रिकेटपटू क्षमता वाढवण्यासाठी इंजेक्शन घेतात
  • चेतन शर्माने स्टिंगमध्ये केला धक्कादायक गौप्यस्फोट
  • झी मीडियाने केला दावा

BCCI chief selector Chetan Sharma talk about doping in Indian Cricket : झी मीडियाने भारतीय क्रिकेट टीमच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा केला आहे. चेतन शर्मा स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडपणे धक्कादायक गौप्यस्फोट करत असल्याचाही दावा झी मीडियाने केला आहे. निवडक भारतीय क्रिकेटपटू क्षमता वाढवण्यासाठी इंजेक्शन घेतात, डोपिंग करतात. डोपिंग करणाऱ्यांमध्ये काही प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू पण आहेत, अशा स्वरुपाचा धक्कादायक गौप्यस्फोट चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केल्याचा दावा झी मीडियाने केला आहे.

क्रिकेटपटू जे इंजेक्शन घेतात ते डोपिंग टेस्टमध्ये लक्षात येत नाही. याचा गैरफायदा क्रिकेटपटू घेत आहेत. जेमतेम 80 टक्के फिट असलेले क्रिकेटपटू इंजेक्शन घेऊन 100 टक्के फिट होतात आणि मैदानात उतरतात असा गौप्यस्फोट चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये केल्याचा दावा झी मीडियाने केला आहे.

भारतीय क्रिकेटपटूंना कोणते इंजेक्शन किती प्रमाणात आणि कधी घेतले तर डोपिंग टेस्टमध्ये दिसत नाही हे माहिती आहे. या माहितीचा क्रिकेटपटू व्यवस्थित वापर करत आहेत. अनफिट खेळाडू योग्य वेळी इंजेक्शन घेऊन 100 टक्के फिट असल्याचे दाखवतात. प्रत्यक्षात फिट नसूनही मैदानात उतरतात. 

भारतीय क्रिकेटमध्ये प्रत्येक जागेसाठी जबरदस्त स्पर्धा आहे. एकदा टीममधून बाद झालेल्या खेळाडूला पुन्हा स्थान मिळवणे कठीण झाले आहे. याच कारणामुळे भारतीय क्रिकेटपटू डोपिंग करत असल्याचे चेतन शर्मा यांनी स्टिंगमध्ये सांगितल्याचा दावा झी मीडियाने केला आहे. 

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या काय करतेय?

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे अनफिट आहे. सध्या टीमच्या बाहेर आहे. त्याला इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना दुखापत झाली. दुखापत झाली असूनही फिट असल्याचा दावा करत तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 वर्ल्ड कप आधी एक टी 20 मॅच खेळला. या मॅचमध्ये पुन्हा त्याची दुखापत बळावली. दुखापत बळावल्यामुळे सध्या बुमराह टीम बाहेर आहे. प्रत्यक्षात फिट असल्याचा दावा करून बुमराह टी 20 वर्ल्ड कपमध्ये एखादी मॅच खेळला असता तर कदाचित 1 वर्षासाठी संघाबाहेर राहिला असता असे चेतन शर्मा यांनी सांगितले. 

border-gavaskar trophy :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 200 पेक्षा जास्त रन बनवणारे खेळाडू

WPL : T20 वर्ल्ड कप खेळत असलेल्या या भारतीय महिला क्रिकेटपटूंना झाला फायदा

चेतन शर्मा यांच्या झी मीडियाने केलेल्या स्टिंगचा क्रिकेट विश्वावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. चौकशी झाली तर क्रिकेट विश्वात उलथापालथ होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी