Team India: वर्ल्ड कपमध्ये खेळाडूची पत्नी सात आठवडे सोबतच; आचारसंहितेचा भंग?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 21, 2019 | 15:56 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Team India: क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियातील एका वरिष्ठ खेळाडूने नियमांचा भंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. टीम स्पर्धेत असताना संबंधित खेळाडूची पत्नी त्याच्यासोबत राहत होती.

Team India cricket
टीम इंडियात कोणी केला आचारसंहिताचे भंग?   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सात आठवडे पत्नीसोबत राहिला टीम इंडियााचा वरिष्ठ खेळाडू
  • वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडूकडून बीसीसीआयच्या नियमांचा भंग?
  • टीम व्यवस्थापनाच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह
  • टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूवर कारवाई होणार का?

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये अतिशय खराब कामगिरी केली. न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरं जाताना भारताचा डाव अक्षरशः गडगडला. शेवटच्या टप्प्यात मॅच हातात येऊनही भारताला विजय साकारता आला नाही. त्यानंतर टीम इंडियामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या. २०१७मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधील पराभवानंतरही तेच घडलं होतं. वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर आता खेळाडूंचे वर्तन, मतभेद याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. त्यात आचारसंहिता भंगाची चर्चा ही सुरू झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियातील एका वरिष्ठ खेळाडूने नियमांचा भंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. टीम स्पर्धेत असताना संबंधित खेळाडूची पत्नी त्याच्यासोबत राहत होती, अशी चर्चा आहे. मात्र, अद्याप त्या खेळाडूचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. यासंदर्भात बीसीसीआय काय पावले उचलणार हेदेखील स्पष्ट झालेले नाही.

सात आठवडे पत्नी सोबत

टीममधील एका ज्येष्ठ खेळाडूने वर्ल्ड कप दरम्यान, बीसीसीआयच्या कौटुंबिक आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे ‘तो’ वरिष्ठ खेळाडू चर्चेत आला आहे. पण, त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना १५ दिवस पत्नीसोबत राहण्याची अनुमती देण्यात आली होती. पण, संबंधित खेळाडू त्याच्या पत्नीसोबत १५ दिवसांपेक्षा अधिक काळ राहिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्या खेळाडूची पत्नी संपूर्ण स्पर्धेदरम्यान सात आठवडे पतीसोबतच होती. विशेष म्हणजे, त्यासाठी संघाचा कॅप्टन आणि कोच यांची कोणत्याही प्रकारने अनुमती घेण्यात आलेली नव्हती.

वर्ल्ड कप स्पर्धे दरम्यान, या घटना होण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेऊन, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने तीन मे रोजी या विषयावर चर्चा केली होती आणि खेळाडूंच्या पत्नींना सोबत राहण्यापासून मनाई केली होती. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांपैकी एकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. आचारसंहिता भंग निश्चित झाल्याचं त्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.

कोण देणार अहवाल?

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित खेळाडू पत्नीसोबत राहण्यासाठी विनंती करत होता. ३ मे रोजी झालेल्या चर्चेत त्याच्यावरही चर्चा झाली. पण, त्याला अनुमती देण्यात आली नाही. परंतु, १५ दिवसांच्या अटीचा भंग त्या खेळाडूकडून झाला आहे. त्या खेळाडूने कॅप्टन विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांची अनुमती घेतली होती का? याचे उत्तर नाही, असे येत आहे. या संदर्भात आलेल्या माहितीमध्ये टीमचे प्रशासकीय मॅनेजर सुब्रमण्यम यांना या प्रकाराची माहिती का देण्यात आली नाही?  बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हा सगळा प्रकार सुरू असताना मॅनेजर सुब्रमण्यम काय करत होते? केवळ टीमच्या प्रॅक्टिस सेशनचे निरीक्षण करणे हे त्यांचे काम नव्हते. त्याचबरोबर कोच, कॅप्टन आणि सपोर्ट स्टाफ हे सगळं पाहत होता. या संदर्भात प्रशासकीय समिती कठोर भूमिका घेऊन सुब्रमण्यम यांच्याकडून अहवाल घेईल, अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी