Sourav Ganguly :बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या भविष्याचा निर्णय आज, अध्यक्षपदी राहणार की नाही हे आज ठरणार

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीच्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबतचा निर्णय बऱ्याच काळापासून प्रलंबित होता. त्याचा निर्णय आज लागणार आहे आणि त्याचे भविष्य ठरणार आहे.

Sourav Ganguly
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या भविष्याचा निर्णय आज, अध्यक्षपदी राहणार की नाही हे आज ठरणार  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • सौरव, शहा आणि जॉर्ज तिघेही आहेत कूलिंग पीरियडमध्ये
  • 23 मार्च रोजी होणार होती सुनावणी
  • खंडपीठ प्राधान्याने करणार प्रकरणाची सुनावणी

Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) माजी कर्णधार (former captain) आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष (BCCI President) सौरव गांगुलीसाठी (Sourav Ganguly) आजचा म्हणजेच 15 एप्रिलचा दिवस महत्वाचा आहे. आज त्याच्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरील भविष्याचा (future) निर्णय (decision) लागणार आहे. तसेच बीसीसीआयचा पदाधिकारी जय शाह (Jay Shah) आणि जयेश जॉर्ज (Jayesh George) यांच्या भविष्याचा निर्णयही आज होणार आहे. हे प्रकरण दीर्घ काळापासून सर्वोच्च न्यायालयासमोर (Supreme Court) प्रलंबित (pending) आहे आणि आज या तिघांनी त्यांच्या पदांवर राहावे की पायउतार व्हावे याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार आहे. हे प्रकरण कूलिंग पीरियडशी (cooling period) संबंधित आहे.

सौरव, शहा आणि जॉर्ज तिघेही आहेत कूलिंग पीरियडमध्ये

सर्वोच्च न्यायालयाद्वारे ऑगस्ट 2019मध्ये पारित केलेल्या बीसीसीआयच्या संविधानानुसार सौरव गांगुली, जय शहा आणि जयेश जॉर्ज हे तिघेही आपल्या कूलिंग पीरियडमध्ये आहेत. यानुसार राज्य संघ किंवा बीसीसीआयच्या सर्व क्रिकेट प्रशासकांना तीन वर्षांनी आपले पद सोडावे लागेल. यांचा कार्यकाळ 2020च्या मध्यातच पूर्ण झाला आहे.

23 मार्च रोजी होणार होती सुनावणी

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. बीसीसीआयच्या अध्यक्षपद आणि पदाधिकाऱ्यांबाबतची ही सुनावणी याआधी 23 मार्च रोजी होणार होती, पण त्यावेळी न्या. राव हे मराठा आरक्षणाच्या सुनावणीत व्यस्त होते, त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलावी लागली.

खंडपीठ प्राधान्याने करणार प्रकरणाची सुनावणी

आऊटलुकच्या बातमीनुसार न्यायमूर्ती राव आणि न्यायमूर्ती विनीत सरन या प्रकरणाची सुनावणी प्राधान्याने करणार आहेत. न्यायमूर्ती राव यांनी याआधीही 2014मध्ये आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणाचा तपास केला होता. बीसीसीआयच्या मते गांगुली, शाह आणि जसेश यांनी कूलिंग पीरियडशिवाय काम चालू ठेवावे. या खंडपीठाने उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे सचिव युद्धवीर सिंह यांच्याविरोधात एक अवमान याचिकाही स्वीकारली आहे. ते एक सरकारी अधिकारी आहेत आणि कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार संविधान देत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी