सौरव गांगुलीची गुगली, एका ट्विटने BCCI ला स्पष्टीकरण देतादेता आला तोंडा फेस

Sourav Ganguly Resign News: सौरभ गांगुलीने आज त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल चाहते आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानले आहेत. यासोबतच गांगुलीने पुढील वाटचालीसाठी लोकांचा पाठिंबा मागितला होता.

BCCI president's emotional post, Sourav Ganguly's new innings
सौरव गांगुलीची भावूक पोस्ट, BCCI अध्यक्ष सुरु करणार नवी इंनिंग  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीची भावनिक पोस्ट
  • सौरव गांगुलीच्या राजीनाम्याची चर्चा रंगू लागली
  • जय शाह यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल नवीन अटकळ बांधली जात होती. सौरव बीसीसीआय अध्यक्षपद सोडू शकतो अशी चर्चा आहे. ही अटकळ सौरवच्या ट्विटर पोस्टनंतर सुरू झाली ज्यात त्याने लिहिले की मी काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहे जे मला वाटते की कदाचित बऱ्याच लोकांना मदत होईल. मी माझ्या जीवनाच्या या अध्यायात प्रवेश करत असताना तुम्ही मला पाठिंबा देत राहाल अशी आशा आहे. (BCCI president's emotional post, Sourav Ganguly's new innings)

अधिक वाचा : AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात कोरोनाचा शिरकाव; मुख्य प्रशिक्षक आयसोलेशनमध्ये

सौरवच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र, एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, सौरव बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही. अशा स्थितीत बीसीसीआयची कमान दादांच्या हाती राहणार हे स्पष्ट झाले आहे.

अलीकडेच, कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गृहमंत्री अमित शहा यांनीही सौरवची भेट घेतली. यादरम्यान गृहमंत्री सौरवच्या घरी पोहोचले होते आणि दोघांनी तिथे एकत्र जेवण केले होते. यादरम्यान सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपचे अनेक नेतेही डिनरला उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी