बीसीसीआयचे सचिव जय शाहांनी कोहलीविषयी केलं मोठं विधान, म्हणाले कर्णधारपद बदलण्याचा प्रश्न येतोच कुठे

बीसीसीआयच्या सचिवांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाचे भविष्य ठरवले आहे. त्यांनी टी -20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियातील बदलावरून निर्माण झालेले सर्व संभ्रम दूर केले आहेत.

BCCI secretary Jay Shah made a big statement about Kohli
बीसीसीआयचे सचिव जय शाहांनी कोहलीविषयी केलं मोठं विधान,   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • विराट कोहली तिन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये नेतृत्त्व करतो.
  • कर्णधारपदाची जबाबदारी वाटून घेण्यास विराट कोहली तयार.
  • टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याच्या बातम्या निराधार - जय शाह

मुंबई :  टी -20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघात (Indian cricket team) मोठी घडामोड होणार असल्याची शक्यता आहे. विराट कोहली (Virat Kohli) कर्णधारपदाची (captaincy) जबाबदारी सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजला साजेशा धावा होत नसल्यामुळे सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली चिंतेत आहे. यामुळे कर्णधार पद सोडणार असल्याचं सांगितले जात आहे. इतकेच काय तर भारतीय संघाचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत नेतृत्व करणारा कोहली नेतृत्वाचे विभाजन करण्यासही तो उत्सुक असल्याची आहे. या सर्व बातम्यांमुळे क्रिकेट विश्वात आणि क्रिकेट रसिकांना धक्का बसला आहे. या सर्व घडामोडीवर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कर्णधारपदावरुन मोठं विधान केलं आहे.

कर्णधार बदलण्याचा प्रश्नच नाही : जय शाह

बीसीसीआयच्या सचिवांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाचे भविष्य ठरवले आहे. त्यांनी टी -20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियातील बदलावरून निर्माण झालेले सर्व संभ्रम दूर केले आहेत. जय शाह यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीवर भर देताना सांगितले की, “सध्या संघ जी कामगिरी करत आहे, ती चांगली होत ​​आहे. त्यामुळे कर्णधारपद बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”.   

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्याच्या आणि टीम इंडियात कर्णधारपदाचे विभाजन झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आल्या होत्या. टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहली एकदिवसीय आणि टी -20 मध्ये कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवेल. विराट फक्त कसोटी क्रिकेटचा कर्णधार असेल, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या बातम्यांवर आता खुद्द जय शाह यांनी पडदा टाकला आहे. टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याच्या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जय शाह यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाला संघाच्या कामगिरीशी जोडले इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतल्याचे त्यांनी सांगितले. इतकंच नाही तर टी 20 मध्ये विराटच्या नेतृत्त्वात टीम इंडियाच्या जबरदस्त कामगिरी केल्याचेही शाह म्हणाले. कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया टी 20 किंवा वन डेमध्ये सहसा पराभूत झालेली नाही.

भारताने इंग्लंडविरुद्ध 3–2 असा विजय मिळवला, ऑस्ट्रेलियामध्ये 2-1 ने जिंकले, श्रीलंकेला 2-0 ने पराभूत केले आणि न्यूझीलंडला 4-0 ने हरवले. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारताला ICC स्पर्धेची ट्रॉफी जिंकता आली नाही. त्याच्यासमोर आयसीसी स्पर्धा जिंकणे हे अजूनही मोठे आव्हान आहे.
मात्र आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला इतके यश मिळालेले नाही. विराट कोहली कर्णधार झाल्यापासून भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड टी-२० किंवा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकू शकलेला नाही.

बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक धोनी झाला मेंटॉर 

भारताने गेल्या आठवड्यातच टी -20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. महेंद्रसिंह धोनीला मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आले आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून हा बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले जात आहे. धोनीला मार्गदर्शकाची भूमिका देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची टी-२० मधील कामगिरी इतकी प्रभावी नसल्यानेच हा निर्णय घेत असल्याचं जाणकार सांगतात. एकीकडे विराट कोहली एकदाही आयपीएल जिंकू शकलेला नसताना, धोनीने तीन वेळा चेन्नईला आयपीएल जिंकून दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी