Team India: कोट्यावधींचा खर्च करून वेस्ट इंडिजला पोहोचली टीम इंडिया, चार्टर्ड फ्लाईटसाठी बीसीसीआयने दिली इतकी रक्कम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 21, 2022 | 14:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

west indies tour of team india: टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहोचली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला इंग्लंडवरून वेस्ट इंडिजला पोहोचवण्यासाठी कोट्यावधींचा खर्च केला. हा खर्चाचा आकडा पाहून तुम्ही हैराण व्हाल. 

team india
तब्बल इतके कोटी खर्च करून वेस्ट इंडिजला पोहोचली टीम इंडिया 
थोडं पण कामाचं
  • वेस्ट इंडिजला पोहोचवण्यासाठी केला कोट्यावधींचा खर्च
  • चार्टर्ड फ्लाईटने केला टीमने प्रवास
  • २२ जुलैला होणार दौऱ्याची सुरूवात

मुंबई: भारताचा वेस्ट इंडिज दौऱा(team india west indies tour) येत्या २२ जुलैपासून सुरू होत आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया वेस्ट इंडिजला पोहोचली आहे. टीम इंडियाने इंग्ंलंड(england) ते वेस्ट इंडिजला(west indies) येण्यासाठी चार्टर्ड फ्लाईटचा(charted flight) वापर केला होता. यातच चार्टर्ड प्लेनसाठी झालेला खर्च सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. टीम इंडियाने(team india) या प्रवासासाठी कोट्यावधींचा खर्च केला. बीसीसीआयने(bcci) इतका खर्च यासाठी का केला याचे कारणही समोर आले आहे. (BCCI spend 3.5 crore for team india charted flight from Manchester to port of spain)

अधिक वाचा - ट्रकच्या धडकेनं गर्भवती महिलेचं फाटलं पोट

चार्टर्ड फ्लाईटवर झाला इतके कोटी रूपये खर्च

नुकताच टीम इंडियाचा इंग्लंड दौरा पूर्ण झाला. टीम इंडियाने इंग्लंडच्या मँचेस्टर येथून सरळ वेस्ट इंडिजच्या दिशेने प्रस्थान केले. या फ्लाईटवर झालेल्या खर्चाच नुकताच खुलासा झाला आहे. तुम्हाला जाणून हैराणी होईल की बीसीसीआयने टीम इंडियाला इंग्लंडवरून वेस्ट इंडिजला आणण्यासाठी तब्बल ३.५ कोटी रूपये खर्च केले. हे चार्टर्ड फ्लाईट खेळाडूंना मँचेस्टर येथून पोर्ट ऑफ स्पेनला घेऊन गेले. टीम इंडिया या दौऱ्यावर तीन वनडे सामने आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. 

या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

टीम इंडियाचा जेव्हा चार्टर्ड फ्लाईटमधून प्रवास करण्याची बाब समोर आली तेव्हा असे मानले जात होते की हा निर्णय कोरोना पाहता घेण्यात आला. यामागचे खरे कारण वेगळेच आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार एका सूत्राने सांगितले, बीसीसीआयने चार्टर्ड फ्लाईटवर ३.५ कोटी रूपये खर्च केले. ही फ्लाईट संघाला मँचेस्टर येथून पोर्ट ऑफ स्पेनला रात्री ११.३० वाजता घेऊन आली. संघासाठी चार्टर्ड फ्लाईट बुक करण्याचे कारण कोरोना नव्हते. एका कमर्शियल फ्लाईटध्ये इतके तिकीट्स बुक करणे शक्य नसते. भारतीय संघात १६ खेळाडू आणि सहकारी स्टाफच्या सदस्यांचा समावेश आहे. यात कोच राहुल द्रविडही सामील आहे. खेळाडूंच्या पत्नीही आहे ज्यांनी वेस्ट इंडिजचा प्रवास केला. 

कमी खर्चात झाला असता प्रवास

सूत्रांनी या मुद्द्यावर बोलताना सांगितले, साधारणपणे एका कमर्शियल फ्लाईटमध्ये हा खर्च साधारण २ कोटी रूपये झाला असता. मँचेस्टरवरून पोर्ट ऑफ स्पेनला जाण्यासाठी एका बिझनेस क्लासचे तिकीट साधारण २ लाख रूपये असेल. एक चार्टर्ड उड्डाण अधिक महागडे ठरते. मात्र हा टेक्निकल पर्याय आहे. मोठ्या फुटबॉल संघांकडे आता त्यांचे स्वत:चे चार्टर आहे. 

टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा

भारत-वेस्टइंडीज वनडे सीरीज कार्यक्रम

पहिली वनडे: 22 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

दुसरी वनडे: 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

तिसरी वनडे: 27 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

टी-२० मालिकेचे वेळापत्रक(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू)

पहिला टी-२० सामना - २९ जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-२० सामना - १ ऑगस्ट, सेंट किट्स अँड नेव्हिस
तिसरा टी-२० सामना - २ ऑगस्ट , सेंट किट्स अँड नेव्हिस
चौथा टी-२० सामना - ६ ऑगस्ट, अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये
पाचवा टी-२० सामना - ७ ऑगस्ट, अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये

अधिक वाचा - मेळाव्यात ठाकरेंना पाठिंबा, नेत्यांची पाठ फिरतातच...

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताची वनडे टीम

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी