team india coach: टीम इंडियासाठी नव्या कोचची होणार नियुक्ती; रवी शास्त्री विंडिज दौऱ्यावर जाणार?

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 16, 2019 | 17:38 IST | टाइम्स नाऊ हिंदी

team india coach : टीम इंडियासाठी नव्या कोच, सपोर्ट स्टाफची निवड होणार आहे. ही निवड करणाऱ्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये नव्या सदस्यांची नियुक्ती होईल आणि त्यानंतर ही समिती कोच आणि इतर नियुक्त्या करेल.

team india coach Ravi Shastri  Virat Kohli
टीम इंडियाला मिळणार नवा कोच   |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाला मिळणार नवा कोच; शास्त्रींना तात्पुरती मुदतवाढ
  • क्रिकेट सल्लागार समितीमध्ये काही जागा रिक्त
  • समितीची निवड झाल्यानंतर कोच आणि निवड समिती निश्चित होईल

 नवी दिल्ली : टीम इंडियाने इंग्लंडमधील वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये अतिशय निराशाजनक खेळ केला. जिंकण्याची संधी असूनही भारतीय फलंदाज ढेपाळले आणि तमाम भारतीय चाहत्यांच्या आकांक्षांवर पाणी फिरलं. आता टीममधील मतभेदांबरोबरच कोच रवीशास्त्री आणि सपोर्ट स्टाफवरही टीका होऊ लागली आहे. मुळात वर्ल्ड कपनंतर शास्त्री आणि सपोर्ट स्टाफचा करार संपत आहे. पण, पंधरा दिवसांतच होत असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्याची जबाबदारी रवी शास्त्री आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफवरच सोपवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट टीमचा मुख्य कोच आणि सपोर्ट स्टाफच्या नियुक्तीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सध्याच्या स्टाफमधील शास्त्री आणि त्यांचे इतर सहकारी पुन्हा या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. सध्या बॅटिंग कोच म्हणून संजय बांगर तर, बॉलिंग कोच म्हणून भरत अरुण जबाबदारी सांभाळत आहेत. आर. श्रीधर सध्या फिल्डिंग कोच आहेत. या संपूर्ण स्टाफला सध्या ४५ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

दक्षिण अफ्रिका भारत दौऱ्यावर

टीम इंडिया येत्या ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. त्या दौऱ्यात शास्त्री आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफलाच कायम ठेवण्यात आले आहे. पण, त्यानंतर या सगळ्यांना टीम सोबत काम करण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. सध्या शंकर बासू आणि पॅट्रिक फरहार्ट यांच्या जाण्यानंतर नवा ट्रेकन आणि फिजिओ नियुक्त करावा लागणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम भारतात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. १५ सप्टेंबरपासून दक्षिण अफ्रिकेचा भारत दौरा सुरू होत आहे.

सल्लागार समितीचं काय?

टीम इंडियासाठी नव्या कोचची नियुक्ती होणार आहे. पण, तत्पूर्वी ही नियुक्त करणाऱ्या क्रिकेट सल्लागार समितीचे काय? असा प्रश्न सध्या बीसीसीआय पुढे आहे. बीसीसीआयने कोच आणि निवड समितीच्या नियुक्तीची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीकडे सोपवली आहे. त्यात सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. सध्या गांगुली आणि तेंडुलकर यांनी समिती सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करायची असा प्रश्न सध्या बीसीसीआयपुढे आहे. या समितीची नियुक्ती झाल्यानंतरच टीम इंडियाचा नवीन कोच आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती होऊ शकणार आहे. या संदर्भात बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख साबा करीम यांनी सल्लागार समितीसाठी नावे सूचविण्याच्या सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
team india coach: टीम इंडियासाठी नव्या कोचची होणार नियुक्ती; रवी शास्त्री विंडिज दौऱ्यावर जाणार? Description: team india coach : टीम इंडियासाठी नव्या कोच, सपोर्ट स्टाफची निवड होणार आहे. ही निवड करणाऱ्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये नव्या सदस्यांची नियुक्ती होईल आणि त्यानंतर ही समिती कोच आणि इतर नियुक्त्या करेल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...