virat kohli: विराट कोहलीवर बीसीसीआय करणार नाही कारवाई...नाहीतर होईल हे नुकसान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 17, 2021 | 12:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

virat kohli: विराट कोहली टीम इंडियासह दक्षिण आफ्रिकेला पोहोचला आहे. येथे तो तीन कसोटी सामने आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे की तो कोणतेही सार्वजनिक विधान करणार आहे.

virat kohli
विराट कोहलीवर बीसीसीआय करणार नाही कारवाई...नाहीतर 
थोडं पण कामाचं
  • विराट कोहलीवर नाही कारवाई करणार बीसीसीआय
  • गांगुली-कोहली यांच्यात मतभेद
  • बीसीसीआयमध्ये कोणीही खुश नाही. 

मुंबई: विराट कोहली (Virat Kohli)ने स्वत;ला वनडे कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बुधवारी प्रेस कॉन्फरन्स घेतली. यात त्याने अनेक आश्चर्यजनक खुलासे केले. विराट कोहलीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या(bcci president sourav ganguly) त्या विधानाला खोटे ठरवले. यात त्याने म्हटले होते मी विराट कोहलीला टी-२०चे कर्णधारपद सोडण्यास नकार दिला होता कोहलीने खुलासा केला की त्याला कोणीही टी-२०चे कर्णधारपद सोडण्यापासून रोखले नव्हते. आता यावरून असा सवाल केला जात आहे की अखेर गांगुलीने खोटे का सांगितले? bcci will not action on virat kohli

कोहलीवर मोठी कारवाई नाही करणार बीसीसीआय

विराट कोहली टीम इंडियासह द. आफ्रिकेत पोहोचला आहे. येथे दोन्ही संघादरम्यान तीन कसोटी आणि तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे की तो कोणतेही सार्वजनिक विधान करणार नाही. विराट कोहलीच्या तुफानी प्रेस कॉन्फरन्समुळे स्तब्ध झालेली बीसीसीआय या संकटातून बाहेर पडण्यासाठी पर्यायांचा विचार करत आहे. बीसीसीआय हेही निश्चित करेल की मैदानाच्या बाहेर नाटकीय घटनाक्रमामुळेकसोटी मालिकेतील खेळाडूंचे लक्ष विचलित होणार नाही. 

गांगुली-कोहली यांच्यात मतभेद

भारताचा कसोटी कर्णधार कोहली तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी द. आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान म्हणाला होता की त्याला टी-२०चे कर्णधारपद सोडण्यास सांगण्यात आले नव्हते. त्याचे विधान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या विधानाच्या विरुद्ध होते जे त्याने मीडियामध्ये दिले होते. 

बीसीसीआयमध्ये कोणीही खुश नाही

बुधवारी जे झाले त्यामुळे बीसीसीआयमध्ये कोणीही खुश नव्हते. मात्र त्यांना माहीत आहे की या प्रकरणात लगेचच एखादी प्रतिक्रिया देणे नुकसानदायक ठरू शकते. कोहली द. आफ्रिकेत पोहोचला मात्र कोलकातामध्ये बोर्ड अध्यक्षांनी स्पष्ट केले की ते कोणतेही सार्वजनिक विधान करणार नाहीत. गांगुलीने मीडियाला सांगितले की कोणतेही विधान नाही. कोणतीही प्रेस कॉन्फरन्स नाही. आम्ही हे सावरून घेऊ.  हे बीसीसीआयवर सोडून द्या.

दरम्यान, भारतीय संघ सध्या द. आफ्रिकेत मालिका खेळण्यासाठी गेलेला असताना खेळाडूंचे लक्ष विचलित होईल तसेच त्यांच्या कामावर परिणाम होईल असे कोणतेही पाऊल बीसीसीआय उचलणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी