Asia cup 2022: Virat kohli ची मानसिकता कणखर बनविण्यासाठी BCCI करतयं काम; पॅडी अप्टनला दिली मोठी जबाबदारी

आशिया टी20 वर्ल्ड कपमधील (Asia T20 World Cup) पाकिस्तानविरुद्धात भारताच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाच विकेटने विजय मिळवला. या सामन्यात माजी कर्णधार (Former captain) विराट कोहलीच्या (Virat Kohli) फलंदाजीत (batting) चाहत्यांना आत्मविश्वास दिसला. कोहलीने जरी अर्धशतक किंवा शतक केलं नसेल तरी त्याच्या फलंदाजीत पुर्वीसारखा फॉर्म दिसला.

BCCI is making Kohli's mindset tough, Upton has been given the responsibility
BCCI कोहलीची मानसिकता करतेय कणखर, अॅप्टनकडे दिलीय जबाबदारी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पॅडी अप्टन हे ‘मेंटल कंडिशनिंग’ कोच आहेत.
  • पॅडी अप्टन यांनी विराट कोहलीसोबत 4 सेशन्सच प्लानिंग केलं आहे.
  • कर्णधार रोहित शर्मा पॅडी अप्टन यांच्या नियुक्तीसाठी आग्रही होता.

मुंबई:  आशिया टी20 वर्ल्ड कपमधील (Asia T20 World Cup) पाकिस्तानविरुद्धात भारताच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाच विकेटने विजय मिळवला. या सामन्यात माजी कर्णधार (Former captain) विराट कोहलीच्या (Virat Kohli) फलंदाजीत (batting) चाहत्यांना आत्मविश्वास दिसला. कोहलीने जरी अर्धशतक किंवा शतक केलं नसेल तरी त्याच्या फलंदाजीत पुर्वीसारखा फॉर्म दिसला. या कामगिरीमागे बीसीसीआयने (BCCI) घेतलेल्या मेहतनीचा हात आहे. बीसीसीआयने कोहलीच्या मनातून नकारात्मकता काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.  (BCCI working to strengthen Virat Kohli's mentality; Big responsibility given to Paddy Upton)

कोहलीने आपल्या खेळात पूर्वीप्रमाणे चमक आणावी यासाठी बीसीसीआयने टी20 वर्ल्ड कपच्या दोन महिने आधी पॅडी अप्टन यांची पुन्हा नियुक्ती केली. या नियुक्तीसाठी कर्णधार रोहित शर्मा आग्रही होता. रोहितला पूर्वीचा रनमशीन विराट हवा आहे, त्यासाठी बीसीसीआयही प्रयत्न करत आहे. 

काय करतात पॅडी अप्टन

पॅडी अप्टन (Paddy Upton) हे ‘मेंटल कंडिशनिंग’ कोच आहेत. खेळाडूंना मानसिक दृष्टया कणखर बनवण्यासाठी पॅडी अप्टन काम करतात. याच अॅप्टन यांचा कोहलीला त्याचा आत्मविश्वास परत मिळवण्यात मोठा हात आहे. याबाबतचे वृत्त इनसाइड स्पोर्ट्ने दिले आहे. 
टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली खराब फॉर्मचा सामना करतोय. अशावेळी मानसिक आरोग्य सुद्धा महत्त्वाचं असतं. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मनाची सक्षमता, कणखरता देखील तितकीच महत्त्वाची असते.

Read Also : वादग्रस्त ट्विटप्रकरणी कमाल आर. खानला मुंबई पोलिसांकडून अटक

विराट कोहली मागच्या तीन वर्षात शतक झळकवू शकलेला नाही. त्याच्या बॅट मधून धाव होताना दिसत नाहीत. त्यामुळे सातत्याने त्याच्यावर टीका सुरू आहे. संघातून त्याला बाहेर करण्याची सुद्धा चर्चा सुरू आहे अशात अॅप्टन यांची नियुक्ती कोहलीला परत आत्मविश्वास मिळवून देण्यास फायद्याची ठरत आहे. अप्टन यांची नियुक्त केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु टीम इंडियाची मानसिक आरोग्य लक्षात घेऊन कॅप्टन रोहित शर्मा पॅडी अप्टन यांच्या नियुक्तीसाठी आग्रही होता. 

रिझल्ट दिसायला लागलाय

विराटला वाईट स्थितीतून बाहेर काढण्यासाठी पॅडी अप्टन मेहनत घेत आहेत. अप्टन यांच्या उपस्थितीत गोष्टी हळूहळू बदलू लागल्या आहेत. पॅडी अप्टन विराट कोहलीसोबत वेळ घालवत आहेत. त्याच्याशी चर्चा करत आहेत, त्याचा रिझल्ट हळूहळू दिसायला लागलाय.
विराटला मानसिक दृष्ट्या कणखर बनवून त्याला त्याच्या बेस्ट फॉर्ममध्ये आणणं, हे सध्या अप्टन यांच्यासमोर चॅलेंज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅडी अप्टन यांनी विराट कोहलीसोबत 4 सेशन्सच प्लानिंग केलं आहे.

Read Also : नॉर्कोटिक्स टेररिझम मॉड्यूलचा मुख्य ऑपरेटरला एनआयएकडून अटक

प्रत्येक सेशन हे 45 मिनिटांच असणार आहे. या 45 मिनिटांच्या सेशन्समध्ये पॅडी अप्टन हे विराट कोहलीला बॅटिंग कशी करायची ते सांगणार नाहीत. त्यांचा भर विराटला मानसिकदृष्ट्या कणखर बनवण्यावर असेल. टीम इंडियाच्या व्हिडिओ विश्लेषकाने विराट कोहलीच्या सर्वोत्तम खेळींचे व्हिडिओ बनवलेत. विराट कोहलीच्या मनातील नकारात्मक भावना दूर करुन सर्वोत्तम फलंदाजीसाठी प्रेरित करण्याचं काम अप्टन करणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी