नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. दोन वर्षांनंतर आयपीएलचा कारवाँ पुन्हा भारतात परतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलचा १५वा सीझन भारतात होणार असून सर्व सामने एकाच शहरात खेळवले जातील. हे शहर मुंबई असेल. (BCCI's big announcement, IPL 2022 will be held in this city in India)
मुंबईत 3 क्रिकेट स्टेडियम असून बीसीसीआय याचा फायदा घेणार आहे. आयपीएलच्या या हंगामातही प्रेक्षकांच्या प्रवेशावरील बंदी कायम राहणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलचे सर्व सामने मुंबईतच खेळवले जातील.
आयपीएलची 2020 सीझन संपूर्णपणे UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता तर 2021 सीझनचा दुसरा भाग कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील कार्यक्रम स्थगित झाल्यानंतर संपूर्ण अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आला होता.
पुढील महिन्यात मेगा लिलाव होणार आहे
हा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे. खेळाडूंच्या लिलावापूर्वी विविध संघांनी एकूण 33 खेळाडूंना कायम ठेवले आहे किंवा त्यांची निवड केली आहे. सध्याच्या आठ आयपीएल फ्रँचायझींनी एकूण 27 खेळाडूंना कायम ठेवले आहे, ज्यात चेन्नई सुपर किंग्जमध्ये महेंद्रसिंग धोनी, मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये विराट कोहली यांचा समावेश आहे.
बहुतेक कांगारू खेळाडू लिलावात असतील
ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 59 आणि दक्षिण आफ्रिकेच्या 48 खेळाडूंनी लिलावासाठी आपला दावा सादर केला आहे. याशिवाय वेस्ट इंडिज (41), श्रीलंका (36), इंग्लंड (30), न्यूझीलंड (29) आणि अफगाणिस्तान (20) हे आणखी काही देश आहेत जिथून अनेक खेळाडूंनी नोंदणी केली आहे.