नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित महिला आयपीएल स्पर्धेचा (Women's IPL tournament) प्लॅन बीसीसीआयने (BCCI) तयार केला आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० (Twenty-20 world cup) विश्वचषकानंतर ही आयपीएल (IPL ) खेळवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआयच्या दिग्गजांनी या विषयावर चर्चा केली आहे आणि दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) महिला ट्वेन्टी-२० (Women's Twenty20) विश्वचषकानंतर स्पर्धेसाठी एका महिन्याचा वेळ मिळाला आहे. दरम्यान याबाबतची पुष्टी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह या दोघांनीही पीटीआयला दिलेल्या स्वतंत्र मुलाखतींमध्ये केली होती.
"महिलांची आयपीएल ही पुढच्या वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. आम्ही पहिल्या वर्षासाठी चार आठवड्यांची विंडो राखून ठेवली आहे. दक्षिण आफ्रिकेत ९ ते २६ फेब्रुवारी दरम्यान ट्वेन्टी-२० विश्वचषक आहे आणि त्यानंतर लगेचच आम्ही महिलांचा आयपीएल आयोजित करण्याची योजना आखली आहे. आतापर्यंत, आम्ही पाच संघांसह पुढे जात आहोत, परंतु संभाव्य गुंतवणूकदारांमध्ये खूप रस असल्याने ते सहा असू शकतात. योग्य वेळेत, संघांच्या लिलावाची प्रक्रिया जाहीर केली जाईल," बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
Read Also : गृहमंत्रालयाने स्वातंत्र्य दिनानिमित्त जारी केल्या सूचना
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह या दोघांनीही पीटीआयला दिलेल्या स्वतंत्र मुलाखतींमध्ये २०२३ वर्षात महिला आयपीएल सुरू होईल याची पुष्टी केली होती. बर्याच क्रिकेट प्रेमींचा असा विश्वास आहे की महिलांच्या आयपीएलमुळे क्रांती घडू शकेल आणि भारतातील महिला क्रिकेटच्या दर्जाला मोठी झेप मिळेल.
Read Also : आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर?
"आम्हाला स्टेकहोल्डर्सकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे मी रोमांचित आहे. अनेक विद्यमान आयपीएल संघांनी चौकशी केली आहे आणि फ्रँचायझी घेण्यास गंभीर स्वारस्य व्यक्त केले आहे," शाह यांनी काही वेळापूर्वी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याआधी, गांगुलीने २०२३मध्ये महिला आयपीएल सुरू होण्याबद्दल विश्वास व्यक्त केला होता. "मला ठाम विश्वास आहे की पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ हा महिला आयपीएल सुरू करण्यासाठी खूप चांगला काळ असेल जो पुरुषांच्या आयपीएलइतकाच मोठा आणि भव्य यश असेल," असे गांगुली म्हणाले होते.