WTC Final : हॅगले ओव्हलवरून भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.
हॅगले ओव्हल येथील कसोटीच्या शेवटच्या दिवशी पाऊस झाल्याने श्रीलंकेच्या आशा संपुष्टात आल्या. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या निकालाचा डब्ल्यूटीसीमधील टीम इंडियाच्या स्थानावर कोणताही परिणाम होणार नाही. हॅगले ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने शेवटच्या षटकात श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडचा विजय होताच टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. या पराभवासह श्रीलंकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
अधिक वाचा : किंग कोहलीने पुन्हा घेतले करिष्माई 'अंगठी'चे चुंबन, जाणून घ्या यामागचे रहस्य
कॉमेंटेटर हर्षो भोगले यांनी टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचल्याची बातमी शेअर केली. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, दुसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ ते ११ जून दरम्यान खेळवली जाईल. टीम इंडिया डब्ल्यूटीसीच्या पहिल्या फायनलमध्येही खेळली होती, पण त्यावेळी न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.
अधिक वाचा : ६ इंचांची ती चाल...,टीम इंडियाची दाणादाण उडवला उस्मान ख्वाजाने रचला इतिहास
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान ऐतिहासिक ओव्हल मैदानावर खेळवला जाणार असून यावेळी अंतिम फेरीतील दोन स्पर्धक निश्चित झाले आहेत. इंदूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले होते.