Ben Stokes Retires from ODI: मोठी बातमी! Ben Stokesचा निवृत्तीचा स्ट्रोक; तडकाफडकी एकदिवशीय क्रिकेटमधून निवृतीची घोषणा

इंग्‍लंड कसोटी संघाचा (England Cricket Team) नवनियुक्त कर्णधार बेन स्‍टोक्‍स (Ben Stokes) याने सोमवारी एक धक्कादायक निर्णय जाहीर केला. ऑलराउंडर बेन स्टोक्स याने एकदिवशीय क्रिकेटमधून संन्यास (Ben Stokes Retirement) घेण्याची घोषणा केली. बेन स्टोक्सच्या तडकाफडकी निवृत्तीच्या घोषणेने त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. स्टोक्सच्या धक्कातंत्रामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. 

Ben Stokes Retires from ODI
100 टक्के योग्य कामगिरी करता येत नसल्यानं स्टोक्सची निवृत्ती  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरहममध्ये खेळला जाणारा वनडे क्रिकेट सामना हा स्टोक्सचा अखेरचा सामना असेल.
  • टीम इंडियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिकेत पराभव झाल्यानंतर निवृत्तीची घोषणा.
  • 100 टक्के योग्य कामगिरी करता येत नसल्यानं स्टोक्सची निवृत्ती

Ben Stokes Retires from ODI: इंग्‍लंड कसोटी संघाचा (England Cricket Team) नवनियुक्त कर्णधार बेन स्‍टोक्‍स (Ben Stokes) याने सोमवारी एक धक्कादायक निर्णय जाहीर केला. ऑलराउंडर बेन स्टोक्स याने एकदिवशीय क्रिकेटमधून संन्यास (Ben Stokes Retirement) घेण्याची घोषणा केली. बेन स्टोक्सच्या तडकाफडकी निवृत्तीच्या घोषणेने त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. स्टोक्सच्या धक्कातंत्रामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. 

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरहममध्ये खेळला जाणारा वनडे क्रिकेट सामना त्याच्या किरकिर्दमधील अखेरचा असेल अशी, माहिती देखील त्याने दिली आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघ मंगळवारी आमने-सामने उतरतील. बेन ‍स्टोक्‍सचा या फॉर्मेटमधील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. टीम इंडियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवशीय मालिकेत इंग्‍लंडचा 1-2 असा पराभव झाला. त्यानंतर कर्णधार स्‍टोक्‍स याने 50 षटकांच्या वन डे क्रिकेटमधून संन्‍यास घेतल्याचा निर्णय घेतला.

बेन स्‍टोक्‍सचं वय 31 वर्षे आहे. कसोटी क्रिकेट आणि टी 20 वर फोकस करण्यासाठी स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याची क्रिकेटच्या वर्तुळात चर्चा आहे. ईसीबीने बेन स्‍टोक्‍स याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे ट्वीट केलं आहे. बेन स्‍टोक्‍स याने 11 वर्षांआधी म्हणजेच 2011 मध्ये इंग्लंड संघात पदार्पण केलं होतं. सन 2019 मध्ये इंग्लंड संघाला विश्‍वचषक मिळवून देण्यात बेन स्टोक्सने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

Read Also : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या राष्ट्रीय पातळीत आज स्फोट घडवणार?

बेन स्‍टोक्‍सने आपल्या पोस्टमध्ये म्हणाला की, मी माझ्या सहकाऱ्यांना 100 टक्के देऊ शकत नाही. 50 षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणे हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. इंग्लंड संघातील माझ्या सहकाऱ्यांसोबत खेळताना मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. त्यांच्या सोबतचा हा प्रवास खूप छान होता, असे स्टोक्सने म्हटलं आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी