cricket stories : रामबरन मेमोरिअल प्रिमिअर लीगमध्ये भोसले अकादमी आणि आरएन अकादमी फायनलमध्ये 

cricket u-16 premier league । मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल अंडर १२ प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेची दिमागदार सुरूवात झाली आहे. 

Bhosale Academy and RN Academy Final in Rambaran Memorial Premier League
भोसले अकादमी आणि आरएन अकादमी फायनलमध्ये  
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेच्या आज झाल्या दोन सेमी फायनल 
  • अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १२ स्पर्धेचे आयोजन करतात.
  • रामबरन प्रिमिअर लीगमध्ये भोसले अकादमी आणि आरएन अकादमी फायनलमध्ये 

cricket stories  । मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेच्या आज झाल्या दोन सेमी फायनलमध्ये भोसले अकादमी आणि आरएन अकादमी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. 

अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १२ स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाही. यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने छोट्या स्पर्धा  सर्व मार्गदर्शक नियम पाळून घेण्याची परवानगी मिळाली.  

पहिल्या सेमी फायनलमध्ये भोसले क्रिकेट अकादमीने सीएन स्पोर्ट्सचा ११० धावांनी पराभव केला.  सुरूवातीला फलंदाजी करताना भोसले क्रिकेट अकादमीने २२ षटकात ७ बाद १७६ धावांचा विशाल स्कोअर केला. सत्यनारायण घुगे याने विकेट किपर फलंदाजाने शानदार ७२ धावा केल्या. त्यासाठी त्याने ६० चेंडू खेळले. या खेळीत ९ चौकार लगावले. त्याला आर्य कराळे ३७ आणि अक्षय चिंचवडकर (२४) यांनी चांगली साथ दिली. सीएन स्पोर्ट्सकडून युवराज मनानी याने दोन आणि हेमंत यादव, अंश आणि अरिन पारेख यांनी प्रत्येक एक विकेट घेतल्या. 

भोसले क्रिकेट अकादमीच्या १७६ धावांचा पाठलाग करताना सीएन स्पोर्ट्सचा संघ अवघ्या ६६ धावात गारद झाला. सलामीवर ओम पवार याने सर्वाधिक २३ धावा केल्या. भोसले क्रिकेट अकादमीकडून अक्षय चिंचवडकर याने अष्टपैलू कामगिरी करत ५ विकेट घेतल्या. त्याला मॅथन मिस्त्री याने चांगली साथ दिली आणि ३ विकेट घेतल्या. विधान पटेल आणि धैर्य म्हात्रे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

दुसऱ्या सेमी फायनलमध्ये आरएन क्रिकेट संघाने जीपीसीसी संघाचा १२ धावांनी पराभव केला.  आरएन क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना २२ षटकात ५ बाद १३४ धावा केल्या.  यात यश जगतापच्या ६१ धावाच्या बहुमोल वाटा आहे. त्याला रुग्वेद लाड (२७) आणि केदार मालुसरे (१८) यांनी चांगली साथ दिली. जीपीसीसी संघाकडून सुयोग भासरे आणि सार्थक पाटकर यांनी प्रत्येक दोन विकेट घेतल्या. 

आरएन क्रिकेट संघाच्या १३४ धावांचा पाठलाग करताना जीपीसीसी संघ ४ बाद १२२ धावाच करू शकला. वेदांग मिश्रा (५४) याने शानदार अर्धशतक केले.  त्याला पृथ्वी भालेराव (२७) आणि आर्यन सकपाळ (२३) याने चांगली साथ दिली पण झुंज अपयशी ठरली. आरएन क्रिकेट संघाकडून हेत आणि वेदांत चिले यांनी प्रत्येक एक विकेट घेतली. 

आता अंतीम सामना भोसले क्रिकेट अकादमी आणि आरएन क्रिकेट संघात होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी